खंडाळा : महान्यूज लाईव्ह
महामार्ग 47 वरील केसुर्डी ता.खंडाळा येथे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीचालक जागीच ठार झाला. यामध्ये दुचाकीचालक सोहेल अर्शद मुल्ला (वय19 रा.पाचवड ता.वाई) याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पाचवड ता.वाई येथील सोहेल मुल्ला हा दुचाकी (क्र.एमएच-11-बीएक्स-0265) वरुन शिरवळहून पाचवड बाजूकडे निघाला होता. दरम्यान, सोहेल मुल्ला हा केसुर्डी गावच्या हद्दीत महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आला असता भरधाव वेगाने असलेली दुचाकी अचानकपणे घसरली. यावेळी झालेल्या अपघातामध्ये सोहेल मुल्ला हा गंभीर जखमी होत जागीच ठार झाला आहे.
या घटनेची फिर्याद प्रणव इंगवले याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मदन वरखडे ,नितीन महांगरे हे करीत आहे.











