दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथे शनिवारी झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत झाला.
देवकरवाडी (ता. दौंड) येथे ही घटना घडली. यात वीज अंगावर कोसळून कविता बाजीराव टुले या मेंढपाळ तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत तिचे वडील जखमी झाले. बाजीराव टुले यांच्या मेंढ्यांचा कळप हा देवकरवाडी परिसरात पिलाणे यांच्या शेतात मुक्कामी आहे. शनिवारी संध्याकाळी पावसात वीज अंगावर कोसळून कविताचा मृत्यू झाला. गावातीलच हनुमान विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या कविताच्या या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली होती.











