बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीकडे निघालेला हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा डिझेल वाहणारा टॅंकर उलटला आणि त्यातून डिझेलची गळती सुरू झाली. एम एच 12 एचडी 60 44 क्रमांकाचा हा टॅंकर उलटल्यानंतर परिसरातून नागरिकांची एकच धांदल उडाली.. टॅंकर मधील कोणी जखमी आहे का? हे विचारण्यापेक्षा बादल्या, हंडे घेऊन नागरिक डिझेल गोळा करण्यासाठी धावले!
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महानुज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
बारामती तालुक्यातील या घटनेने पाण्यापेक्षा डिझेल किती महत्त्वाचे आहे हेच आज दाखवून दिले. येथे नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी होती. सारे जण केवळ घरातील मिळेल ती साधने घेऊन हे डिझेल साठवण्यासाठी धावत होते. पाण्याचे मोठे ड्रम, हंडे, बादल्या, बॅरेल यामध्ये पाण्याऐवजी डिझेलने जागा करून घेतली होती. काहीजणांना मोठी साधने मिळाली नव्हती, म्हणून त्यांनी डबे देखील डिझेल भरून घेण्यासाठी आणले होते.
हे डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील पाणी ओतून दिले आणि पाण्याच्या जागेवर डिझेल भरून घेतले. अर्थात तोपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे आता घरातील या नेऊन ठेवलेल्या डिझेलवर सरकारी अधिकारी काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.











