मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील लॉकडाऊनची मुदत आता ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे, मात्र या चौथ्या लॉकडाऊनमधील नव्या सवलती किंवा नवे निर्बंध याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ३० हजारांवर पोचल्याने आहे, तो लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढविण्याशिवाय सरकारपुढे सध्यातरी पर्याय नाही, याखेरीज राज्यातील २१ शहरांमध्ये १०० हून अधिक रुग्णसंख्या झाली असल्याने हा लॉकडाऊन सुरू राहील याची खात्रीच होती. फक्त यामध्ये कन्टेनमेंट झोन स्वतंत्र करून त्यानुसार निर्बंध लादले जातील अशी शक्यता आहे. याखेरीज अन्यत्र शिथीलता आणण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र आदेश लागू करेल. पुणे,मुंबई, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, सातारा, नागपूर ठाणे आदींव्यतिरिक्त इतर ठिकाणी सवलती दिल्या जातील असा अंदाज आहे.










