दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे कोवीड सेंटर मध्ये आज 42 व्यावसायिक आणि इतर 14 अशा 56 व्यक्तींची रॅपीड तपासणी करण्यात आली. 56 पैकी 6 जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये दोन व्यावसायिक पती पत्नीचा समावेश आहे.
ही माहिती पाटस आरोग्य केंद्राच्या आरोग्य समुदाय आरोग्य अधिकारी अंकीता कुलकर्णी आणि आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली.
पाटस ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि यवत पोलीस यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बाधीत रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काल पाटस येथील मुख्य चौकात ये जा करणारे 56 व्यक्तींची रॅपीड चाचणी केली गेली.
56 पैकी 6 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॅाझिटिव्ह प्राप्त झाला होता. काल ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने पाटस परिसरातील सर्व व्यावसयिकांनी कोरोनाची रॅपीड चाचणी करावी असे आव्हान व्यापारी वर्गाला केले होते.
त्यानुसार आज शुक्रवारी ( दि.7 ) पाटस येथील कोवीड सेंटर मध्ये तब्बल 42 व्यावसायिकांची कोरोना रॅपीड चाचणी करण्यात आली. या चाचणीत दोन व्यावसायिक पती पत्नीचा अहवाल कोरोना पॅाझिटिव्ह प्राप्त झाला.
इतर 14 व्यक्तींची केलेल्या तपासणीत चार जण बाधीत निघाले आहेत. बाधीत रूग्णांना लगेच कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोवीड सेंटरच्या समुदाय आरोग्य अधिकारी अंकीता कुलकर्णी, आरोग्य सेवक भिमराव बडे, आरोग्य सेवीका सुप्रिया गद्रे, रुपाली ताठे, सुयज पानसरे, प्रशांत खराडे आदींनी ही रॅपीड चाचणी प्रक्रीया पार पाडली. दरम्यान, कामानिमित्त आणि भाजीपाला तसेच जीवननाश्यक वस्तुंची खरेदीसाठी पाटस मध्ये परिसरातून अनेक नागरीक येत असतात. यामुळे उर्वरीत व्यावसायिकांनीही नागरीकांच्या आरोग्याचा हितासाठी कोरोनाची रॅपीड चाचणी करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











