इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कमी झालेले कोरोनाग्रस्तांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. काल एका दिवसात 283 जण कोरोना बाधित आढळले असून, त्यामध्ये सर्वाधिक 238 जण ग्रामीण भागातील आहेत, तर काल एकाच दिवशी 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील मृत्यूचे प्रमाण वाढून 2.06 वर पोहोचले आहे.
इंदापूर तालुक्यात झपाट्याने कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असून कालपर्यंत 13 हजार 82 रुग्ण संख्या झाली आहे. सध्या तालुक्यात 2494 एक्टिव्ह असून आत्तापर्यंत 10 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी आले होते, परंतु पुन्हा हे प्रमाण वाढले असून कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण देखील कमी आले आहे.
5 मे रोजी 204 जण कोरोनाग्रस्त आढळले होते तर तब्बल 332 जणांना डिस्चार्ज दिला होता, मात्र काल 283 जण कोरणा बाधित आढळले, तर फक्त 103 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये इंदापूरकरांनीदेखील शेजारच्या बारामती तालुक्याचे अनुकरण करत, कडक निर्बंधाचे पालन करण्याची आवश्यकता आहे.











