बारामती : महान्यूज लाईव्ह
चार एप्रिल रोजी बारामतीत तपासणी झालेल्या 1268 रुग्णांमध्ये 411 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी परवाच दोनशे एक जण कोरोना बाधित आढळले होते, तर प्रतिक्षेमध्ये 547 नमुने होते. त्याचा अहवाल काल आला, त्यामध्ये 210 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बारामतीतील कोरुना रुग्णांची संख्या 19226 वर पोहोचली आहे.
चार एप्रिल रोजी तपासणी झालेल्या रुग्णांची माहिती पाच एप्रिल रोजी आल्यानंतर त्यामध्ये काही रुग्णांचे नमुने प्रलंबित होते. त्याचा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिला असून 547 नमुन्यांपैकी तब्बल 210 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अगोदरचे 201 आणि हे 210 असे एकाच दिवशी 411 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामती मधील लॉकडाऊन चा परिणाम येण्यास आणखी काही दिवस लागतील. त्यामुळे कोरोनि रुग्ण संख्या कमी झाले आहे अशा आविर्भावात बारामती शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी राहू नये. स्वतःची काळजी घ्यावी, त्याचबरोबर परिसराची व आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. कारण कोरोनाची रुग्ण संख्या पाठीमागे होती तशीच आहे. तिच्यामध्ये बदल झालेला नाही. दिवसाकाठी तीनशेहून अधिक रुग्ण सरासरी आढळून येत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.











