महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एकापाठोपाठ एक आयपीएल स्पर्धेतील खेळाडू कोरोना बाधित होऊ लागल्याने आयपीएलचा हंगाम पहिल्यांदाच निमित रद्द करण्याची वेळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर आली. या वर्षाचा आयपीएल स्पर्धेचा हंगाम आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे फायनल पूर्वीच स्पर्धेची विकेट पडली आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेतील सहभागी असलेल्या खेळाडूंच्या कोरोना चाचणी संदर्भात सातत्याने वेगवेगळे नियम होत होते. त्यातच एकापाठोपाठ एक असे करत वेगवेगळ्या लीगमधील खेळाडू कोरोना बाधित होऊ लागल्याने सोमवारचा आरसीबी विरुद्ध केकेआर हा सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर खेळाडूंच्या कोरोना चाचणी संदर्भात वेगळी माहिती येऊ लागल्याने थेट सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला घ्यावा लागला.
यावर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतात आयपीएल स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतल्यापासून या स्पर्धेत मागे कोरोना आणि विविध नियमांचे शुक्लकाष्ट लागले होते. त्यातच चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, कोलकत्ता नाईट रायडर आणि हैदराबाद सनरायझर्स या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पुढे आणखी काही विचित्र स्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी बीसीसीआयने थेट हंगाम संपवण्याचा निर्णय घेतला. मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज ही माहिती जाहीर केली.











