बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयातील फार्मासिस्ट मिनाक्षी निंबाळकर यांनी आपला पहिलाच पगार कोरोना उपचार करणाऱ्या सहकाऱ्यांना मास्क खरेदीसाठी दिला, त्याची महान्यूज मध्ये बातमी प्रसिध्द झाली, त्याची खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी आज दखल घेत निंबाळकर यांचे कौतुक केले.
खासदार सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर महान्यूजच्या बातमीचा दाखला देत मिनाक्षी निंबाळकर यांचे कौतुक केले. महान्यूजने निंबाळकर यांच्या या मास्क भेटीची बातमी पोर्टलवर प्रसिध्द केल्यानंतर त्याची दखल घेत सुळे यांनी निंबाळकर यांना शुभेच्छा दिल्या.
सणसर (ता. इंदापूर) येथील मिनाक्षी निंबाळकर यांनी त्यांचा पहिला पगार कोरोनाशी लढण्यासाठी दिला. त्या एक महिन्यापूर्वी बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात रुजू झाल्या आहेत, त्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे कौतुक वाटते अशा शब्दांत या शुभेच्छा सुळे यांनी निंबाळकर यांना दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांचे फेसबुक पेजवरील हे कौतुकाचे क्षण!










