बारामती: महान्यूज लाईव्ह
काल (दि.1) जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 3 हजार 934 रुग्णांकरिता फक्त 1380 रेमेडीसिवीर इंजेक्शन्स मंजूर केले आहेत. 30 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी 12278 रुग्णांकरिता 5 हजार 192 इंजेक्शन मंजूर करून केली होती, त्यानंतर काल फक्त 1380 इंजेक्शन्स उर्वरित दवाखान्याला मिळाली आहेत.
यामध्ये बारामतीतील सोमेश्वर आयसीयू हॉस्पिटल करता 8 रुग्ण क्षमतेसाठी 3, सुखायु जनरल हॉस्पिटल मधील 5 रुग्ण क्षमतेसाठी 2, शास्त्री हॉस्पिटल काटेवाडीतील 25 रुग्ण क्षमतेसाठी 9, मंगला कोविड हॉस्पिटल साठी 2 रुग्ण क्षमतेसाठी 1, शिवराज नर्सिंग होम कसबा मधील 12 रुग्ण क्षमतेसाठी 4, एकदानी हॉस्पिटल मधील 6 रुग्ण क्षमतेसाठी 2, स्वयंभू हॉस्पिटल मधील 3 रुग्ण क्षमतेसाठी 1, मयुरेश्वर हॉस्पिटल मोरगाव मधील 21 रुग्ण क्षमतेसाठी 7, पवार हॉस्पिटल मधील 35 रुग्ण क्षमतेसाठी 12 एवढी इंजेक्शन्स मंजूर करण्यात आली आहेत.
दौंड साठीचे वितरण असे आहे
दौंड मधील आनंद हॉस्पिटल यवत करिता 20 रुग्ण क्षमतेसाठी 7, दिवेकर हॉस्पिटल वरवंड मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 3, काळे हॉस्पिटल दौंड मधील 16 रुग्ण क्षमतेसाठी 6, कोल्हे हॉस्पिटल दौंड मधील 7 रुग्ण क्षमतेसाठी 2, महालक्ष्मी लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल दौंड मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 3, महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी गोपाळवाडी रोड हॉस्पिटल करता 45 क्षमतेसाठी 16, मयुरेश्वर हॉस्पिटल केडगाव मधील 36 रुग्ण क्षमतेसाठी 13, सिद्धिविनायक हॉस्पिटल दौंड मधील 12 रूग्ण क्षमतेसाठी 4 अशी इंजेक्शन्स मंजूर करण्यात आली आहेत.
इंदापूर साठीचे वितरण असे असेल
इंदापूर मधील भिगवण मेडिकेअर हॉस्पिटल मधील 16 रुग्ण क्षमतेसाठी 6, लाइफ केअर सेंटर इंदापूर मधील 14 रुग्ण क्षमतेसाठी 5, निळकंठेश्वर आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जंक्शन येथील 36 रुग्ण क्षमतेसाठी 13, निळकंठ हॉस्पिटल इंदापूर मधील 14 रुग्ण क्षमतेसाठी 5, ओजस हॉस्पिटल मधील 9 रुग्ण क्षमतेसाठी 3, पार्वती नर्सिंग होम येथील 14 रुग्ण क्षमतेसाठी 5, शांतीसागर हॉस्पिटल इंदापूर मधील 9 रुग्ण क्षमतेसाठी 3, श्रेयस नर्सिंग होम इंदापूर मधील 7 रुग्ण क्षमतेसाठी 2, सिद्धिविनायक हॉस्पिटल मधील 22 रूग्ण क्षमतेसाठी 8, यशोदीप हॉस्पिटल इंदापूर मधील 25 रुग्ण क्षमतेसाठी 9, यशोधरा ट्रॉमा सेंटर भिगवण येथील 22 रूग्ण क्षमतेसाठी 8 इंजेक्शन मंजूर करण्यात आली आहेत.











