सोलापूर – महान्यूज लाईव्ह
निराधार महिलांसाठी आधार बनलेल्या, प्रभावी वक्ते, लेखिका असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांचे आज सोलापूरातील खासगी रुग्णालयात निधन झाले.
संपूर्ण राज्यात अपर्णा रामतीर्थकर यांची व्य़ाख्याने गाजली. संस्कारक्षम कुटुंबनिर्मितीसाठी त्यांनी ध्यास घेतला होता. चला नाती जपूया, आईच्या जबाबदाऱ्या अशा विषयांवर त्यांनी पाच हजारांहून अधिक भाषणं दिली. लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे यासाठी त्या आक्रमकपणे कार्य करीत होत्या. त्यांची आक्रमक भूमिका अनेक वेळी वादग्रस्तही ठरली, मात्र त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले. त्यांनी मोहोळ तालुक्यात फासेपारधी मुलांच्या वसतीगृहासाठी निधी देऊन तेथील आश्रमशाळा उभी केली. पाखर संकुल, उद्योगवर्धिनी या संस्थांवर त्यांनी काम केले. कुटुंब एकत्र असावे, एकमेकांची नाती जपावीत, आई, बहिण, सून या साऱ्यांनी आपापल्या भूमिका एकसंघ कुटुंबासाठी परस्परसामंजस्याच्या ठेवाव्यात यासाठी त्यांचा सदैव आग्रह होता.
मागील महिन्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्या दवाखान्यात उपचार घेत होत्या. त्यांनी राज्यातील अनेक महिलांचे तुटलेले संसार जोडले. nsi�W]�x�











