• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या धाराशिवच्या सराईत टोळीला ४८ तासांत बेड्या! दोन कार जप्त, आणखी साथीदारांचा शोध सुरू!

mahaanewslive by mahaanewslive
September 1, 2026
in महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, Featured
0
सुपेतील सलग अपघातांनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; अल्पवयीनांच्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा इशारा..!

नाशिक : समृद्धी महामार्गावर वाहन अडवून प्रवाशांना मारहाण करत रोकड व दागिने लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दरोड्यात वापरण्यात आलेल्या दोन चारचाकी वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२७ ऑगस्ट रोजी रात्री वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ५४२-१, मळदोन शिवारात ही धक्कादायक घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथील फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय मारुती सुझुकी एक्सएल-६ कारने मुंबईच्या दिशेने जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या वाहनाच्या चाकासमोर लोखंडी वस्तू फेकून कार अडवली.

कार थांबताच मागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पाठलाग करून आलेले दुसरे वाहनही अडवले आणि त्यातील प्रवाशांना लाकडी दांडक्याने मारहाण करून रोकड लुटल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळ तसेच समृद्धी महामार्ग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपी धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार चार स्वतंत्र पथके धाराशिव जिल्ह्यात रवाना करण्यात आली.

पोलिसांच्या पथकांनी धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी आणि क्यूआरटीच्या पथकांच्या मदतीने रात्रभर पाळत ठेवली. अखेर एकाच वेळी छापा टाकून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये नितीन ऊर्फ सुनील हिरामण शिंदे (३४), गोविंद शिवाजी पवार (१९), अशोक हिरामण शिंदे (३७), अर्जुन व्यंकट पवार (५५), धनाजी अर्जुन पवार (२२), लखन भारत काळे (२२) आणि गोविंद ऊर्फ रामा व्यंकट पवार (५०) यांचा समावेश आहे.

सराईत गुन्हेगारांची धक्कादायक पार्श्वभूमी
पोलिसांच्या चौकशीत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही माहिती समोर आली आहे. काही आरोपींवर धाराशिव, बीड, सोलापूर आणि पुणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीच दरोडा, जबरी चोरी, मारामारी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गोविंद ऊर्फ रामा व्यंकट पवार याच्यावर येरमाळा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात मोक्का कायद्याच्या तरतुदींचाही उल्लेख आहे. याशिवाय या प्रकरणातील अर्जुन बालाजी शिंदे, अनिकेत ऊर्फ अनिल बालाजी शिंदे, अशोक पोपट पवार आणि शंकर बाजीराव काळे हे आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्यावरही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात..
दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या महिंद्रा कंपनीच्या दोन XUV-500 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या वाहनांचे क्रमांक MH-42-H-9976 आणि MH-42-K-1777 असे आहेत. या वाहनांचा वापर करून महामार्गावर वाहनांना अडवून प्रवाशांची लूट करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. ताब्यातील आरोपींनी समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांच्या चाकांसमोर लोखंडी वस्तू टाकून वाहने थांबवणे, प्रवाशांना मारहाण करणे आणि त्यांच्याकडील रोकड व दागिने लुटणे, अशी पद्धत वापरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून, त्यांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताब्यातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. या कालावधीत दरोड्यातील मुद्देमाल, फरार साथीदार आणि अन्य गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वावी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण तसेच धाराशिवमधील विविध पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Next Post
उजनीतील सौर प्रकल्पाविरोधात पळसदेव येथे मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन!

उजनीतील सौर प्रकल्पाविरोधात पळसदेव येथे मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group