• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

mahaanewslive by mahaanewslive
June 18, 2026
in सामाजिक, मनोरंजन, मराठवाडा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

अॅड. सचिन वाघ, बारामती

प्रवासी माणसाच्या आयुष्यात रोज नवे नवे किस्से घडत राहतात. किंबहुना खरंतर अशा किस्स्यांसाठीच जगभर लोक प्रवास करत राहतात. गेल्या काही दिवसात अचानक काही मित्र ऑफिसला आले आणि बोलता बोलता संध्याकाळी 5 वाजता उज्जैनला निघायचा प्लॅन झाला.  या रोड ट्रिप प्रवासातला एक किस्सा नेहमी बातम्या पाहताना आठवतोय.

आम्ही 7 वाजता संध्याकाळी बारामती सोडली. मी, मोहन तात्या, गणेश आटोळे आणि जय दादा.. म्हणजे बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील. यावेळी आमच्या क्रेटाचा नंबर आला होता उजैनला जायचा..! जातानाच गाडीमध्ये बऱ्यापैकी डिझेल भरलेलं होत. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आणखी भरू असा विचार होता. गप्पांच्या नादात आम्ही संभाजीनगर सोडले.. रात्रीचा प्रवास आणि गप्पांमध्ये खरात पासून ट्रम्प , मोदी पर्यत अनेक विषय सुरू होते.

काही अंतर गेल्यावर अचानक आमच्या लक्षात आलं की, गाडी फक्त 26 किलोमीटर जाऊ शकते. आम्ही हदरलो.. मग पंपाचा शोध सुरु केला.. बघतो तर दोन तीन पंप पूर्ण बंद.. आता गाडीतल्या गप्पांमध्ये मोदींच्या बाजूने असणारे मोहनतात्या सुद्धा हळू आवाजात का होईना ‘  मोदी आणि ट्रम्प ला शिव्या द्यायला लागले होते.  नशिबाने पुढे एक चालू असलेला पंप दिसला..

पण जसं जवळ जाऊ, तसं लक्षात आलं की, तिथं अर्ध्या किमीपेक्षा जास्त गाड्यांची लाईन लागलेली अन 200 ते 300 ड्रम रांगेत ठेवलेले आणि 200 पेक्षा जास्त लोक पंपावर होते..अन जोरदार वादावादी चालू होती.  आमची अक्कल बंद झाली. तरीही गाडी रांगेत लावली…सगळी चौकशी केली. पण पुढे आणि मागे कोठेही पंप नाही.

मग वाद चाललेल्या ठिकाणी जयदादा, मी गेलो तर पम्प मालकाबरोबर ड्रम आधी का गाडी या वरून जोरात भांडण लागलेली. 3 तासापेक्षा जास्त वेळ लोक थांबलेले आणि लोकल लोक बाहेरच्यांना काही बोलू देत नव्हते. ते स्वतः गाडी आणि त्यामध्ये 4 ते 5 ड्रम घेऊन आले होते. अचानक सगळ्या वादात जयदादांनी उडी घेतली. माझ्या लक्षात आलं आता काहीतरी जुगाड होणार आहे. जय पाटलांकडे असलेलं मॉब सायकॉलॉजी हाताळण्याचं कौशल्य मी पाहत होतो.

त्यांनी कधी मालकाची बाजू तर कधी डिझेल घेणाऱ्या लोकांची बाजू घेत सगळ्यांना शांत करायला सुरवात केली. मग आपोआप सगळे जण त्यांना फॉलो करायला लागले. अनेक लोकांना तेच खरे मालक असून आतापर्यत होता, तो मॅनेजर होता असा समज घेऊन मूळ मालकाची तक्रार करायला लागले. या शिवाय तो मालकही त्यांचा आधार घेऊ लागला. ग्राहक पण आधार घेऊ लागले. लिननचा कडक पांढरा शर्ट आणी बारामतीचा अनुभव यातून त्यांची पर्सनॅलिटी काम करून गेली.

तो पर्यन्त मोहनतात्याने ड्रम शोधायला सुरवात केली. एका माणसाला गोड बोलूनत्याचा ड्रम आणला…तोपर्यंत पंपावरील परिस्थिती बदलली आणि जयदादा सांगतील तस पंपावर होऊ लागलं…शेवटी त्यांनी एक गाडी आणी एक ड्रम असा तोडगा काढला. एक गाडी भरली की, तात्या त्याचा ड्रम घेऊन आले. सगळे लोक ओरडायला लागले. दादा तात्याची ओळख नसल्यागत त्याला रागावले..काय रे, असं मध्ये मध्ये काय घुसताय? नंतर बोलले, भर तुझा ड्रम अन हो बाजूला.. बस्स मग काय आपोआप त्यात डिझेल मिळालं..

गणेश गाडीत बसून होता…तो लगेच गाडी घेऊन आला. ज्यांनी ड्रम दिला त्यांनीच डिझेल क्रेटा मध्ये ओतलं. शिवाय हितून पुढं वाद घालू नका, म्हणून शिस्तीचे चार दोन धडे त्या पंपावर शिकवून आम्ही क्रेटा मध्ये बसलो. आणि हसत हसत जय महाकाल चा जयघोष केला.. गाडीने वाऱ्याची दिशा धरली.. माझ्या मनात मात्र गुरू ठाकुरच्या ओळी घुमत राहिल्या..असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..!

Next Post
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group