• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजकीय पंढरी बारामतीत रणजी सामन्यांची सुरुवात

Maha News Live by Maha News Live
February 12, 2020
in मनोरंजन, मुंबई, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पुणे
0
राजकीय पंढरी बारामतीत रणजी सामन्यांची सुरुवात
  • शरद पवार यांनी घेतला सामन्याचा आनंद

बारामती : महान्यूज लाईव्ह राजकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामतीला आता नवी ओळख मिळाली आहे. आजपासून बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत रणजी क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात देखील रणजी क्रिकेटचे सामने होऊ लागले आहेत याचा आनंद आहे, या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवार यांची बारामती म्हणून सर्वत्र ओळखली जाते. त्याचबरोबर राजकारणातलं महत्वाचं शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मैदानावर बुधवारपासून रणजी क्रिकेट सामन्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात बारामतीला क्रिकेटची नगरी म्हणूनही ओळख मिळणार आहे.
बारामतीमध्ये आज सुरू झालेल्या पहिल्या महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी क्रिकेट सामन्याचे अनौपचारिक उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी प्रत्येक खेळाडूंशी संवांद साधला. यावेळी सर्व क्रिकेटपटूंसोबत फोटोसेशनही करण्यात आलं.  यावेळी शरद पवार यांनी संपूर्ण सामन्याचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिभाताई पवार, विठ्ठल मणियार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.#baramati #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/LOljSIMI8V

— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2020

ग्रामीण भागात देखील रणजी क्रिकेट सामना होतो आहे, क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यास सोबतच ग्रामीण भागातून देखील चांगले क्रिकेटपटू तयार होतील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. बीसीसीआय , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसेच बारामती नगर परिषद यांचेही शरद पवार यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले . बारामतीची निवड बीसीसीआय व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केली, याचा विशेष आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले .

Tags: BaramatiCricket MatchRanji TrophySharad Pawar
Next Post

हुश्श.....दुसरा बिबट्य़ा सापडला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group