• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस ग्रामपंचायतचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! कचरा डेपोतील कचरा जाळला जातो! कारवाईची नागरिकांची मागणी!

tdadmin by tdadmin
January 21, 2025
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पाटस ग्रामपंचायतचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! कचरा डेपोतील कचरा जाळला जातो! कारवाईची नागरिकांची मागणी!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीने घाण, प्लास्टिकचा केरकचरा, व्यवस्थापन डेपोतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तो जाळून जागीच नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत रणजित भंडलकर यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, दौंड तालुका आरोग्य अधिकारी, आणि प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रार केली आहे. पाटस ते दौंड रस्त्यालगत काही अंतरावर असलेल्या अंबिकानगर या लोकवस्तीजवळ पाटस ग्रामपंचायतीने गावातील घाण, केरकचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा व्यवस्थापन डेपो केला आहे. हा कचरा डेपो होऊ नये यासाठी त्यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.

मात्र या डेपोत घाण आणि केरकचरा आणि घाण याची स्वच्छता करू, त्याची योग्य विल्हेवाट लावू, ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासन दिले होते. मात्र मागील पंधरा ते वीस दिवसापासून ग्रामपंचायत प्रशासनांकडून या ठिकाणी उघड्यावर केरकचरा, प्लॅस्टिक कचरा व घाण आणून टाकली जात आहे आणि ती जाळली जात आहे.

परिणामी या परिसरातील अंबिकानगर, रोहिदास नगर तसेच नागेश्वर मंदिर परिसरात जाळण्यात आलेल्या केर कचराचे धुराचे लोट हवेच्या द्वारे जात आहे. तसेच हवेत हे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांना संसर्गजन्य तसेच गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपयोजना केली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ग्रामपंचायत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी एडवोकेट रणजीत भंडलकर यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, दौंड तालुका आरोग्य अधिकारी, दौंड तहसीलदार आणि प्रदूषण महामंडळाकडे लेखी निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीचे संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्वला जाधव यांच्याशी संपर्क साधला असता पाटस हद्दीत जाळण्यात येत असलेला घाण आणि केर कचरा संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Next Post
खरे ओशो समजलेच नाहीत! विश्वविख्यात, क्रांतिकारक, तत्त्ववेत्ता ओशो रजनीश!

खरे ओशो समजलेच नाहीत! विश्वविख्यात, क्रांतिकारक, तत्त्ववेत्ता ओशो रजनीश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group