पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आज सकाळी अपहरण करण्यात आले होते. आज संध्याकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदवणे घाटामध्ये त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आमदार योगेश टिळेकर यांची मामा व शेवाळवाडी येथील उद्योजक सतीश साधबा वाघ यांचे सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास फुरसुंगी रस्त्यावर आकाश लॉन्स च्या जवळ अपहरण करण्यात आले. या घटनेने पुण्यासह मुंबईतही खळबळ उडाली. विधिमंडळाच्या कामकाजात देखील चर्चा झाली.
आज सकाळी नेहमीप्रमाणे वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. आकाश लॉन्स जवळ आले असताना एका गाडीतून आलेल्या अनोळखी इस्मानी त्यांचे अपहरण केले. ती गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विविध ठिकाणी तपासाची चक्रे फिरवली. मात्र दिवसभर तपास लागला नव्हता. संध्याकाळी उरळी कांचन नजीकच्या शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून झाला असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.











