भिगवण: महान्यूज लाईव्ह
पहाटेच्या वेळी बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ पायलटच्या वाहनाला भीषण अपघात होऊन दोन शिकाऊ पायलट जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
बारामती भिगवण रस्त्यावरील लामजेवाडी गावानजिक आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास टाटा हॅरीअर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. हे चौघेजण बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते, अशी माहिती मिळत असून यामध्ये एक महाराष्ट्रातील पायलट असून बिहार राज्यातील एक राजस्थानच्या एका युवतीचा समावेश आहे. यातील गंभीर दोघजणांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नसली, तरी चार चाकी वाहनाच्या स्थितीवरून हा अत्यंत भीषण अपघात झाल्याचे दिसत असून या जखमींना तातडीने केतन वाघ यांच्या रुग्णवाहिकेतून भिगवण येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.











