शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर रविवारी दुपारी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शिरूर हादरून गेले आहे.
या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत. रविवारी दुपारच्या वेळी माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अचानक एका अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. मानेवर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्याने गिलबिले यांची प्रकृती गंभीर झाली होती.
त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गिलबिले यांच्यावर हल्ला कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.











