राजस्थानातील प्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती नावाचा दर्गा आता वादात सापडला आहे. कारण हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी या दर्ग्याच्या खाली कोणी एकेकाळी मंदिर होते असा दावा करणारी याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाने ती याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश मधील संभळ नंतर आता अजमेर देखील वादात सापडले आहे.
उत्तर प्रदेशातील संबळ येथे मशिदीच्या जागी हिंदू मंदिर होते असा दावा करणारी याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी सर्वेक्षण देखील झाले आहे. यावेळी हिंसाचाराची घटना देखील घडलेली आहे. त्यानंतर आता राजस्थान रडारवर आले आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या या दर्ग्याच्या ठिकाणी मंदिर होते अशी याचिका दाखल करण्यात आल्याने आता कोर्ट नेमका काय आदेश देते याच्याकडे हिंदुत्ववादी संघटनांचे लक्ष आहे.
मोईनुद्दीन चिश्ती यांचा हा दर्गा देशभरात प्रसिद्ध आहे. अकबराच्या काळात या दर्ग्याची नूतनीकरण करण्यात आले होते. या दर्ग्याला अगदी औरंगजेबापासून ते औरंगजेबाची मुले देखील माथा टेकायला येत होती असा उल्लेख आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे मूळचे परीक्षेचे पर्शिया मधील सिस्तान या ठिकाणचे. सन 1141 मध्ये त्यांचा जन्म झाला. इराण व अफगाणिस्तानच्या सीमेजवळील या जन्मगावातील मोईनुद्दीन हे पैगंबर मोहम्मद यांचे वंशज मानले जातात.
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती भारतात कसे आले?
मोईनुद्दीन यांना फकीर इब्राहिम कंदोजी यांनी सत्याचा शोध घेण्यासंदर्भात सूचना केली आणि मोईनुद्दीन हे जगाच्या भ्रमंतीवर निघाले. वीस वर्षाचे असताना ते अफगाणिस्तानच्या हेरात येथे ख्वाजा उस्मान हरूनी यांना भेटले. तिथे त्यांनी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून चिस्ती बनण्याचा प्रवास सुरू केला. कुतुबुद्दीन बक्तीयार काकी हे त्यांचे पहिले शिष्य होते. त्यांच्या समवेत ते मुलतान ला गेले. तिथे त्यांची हिंदू तत्त्वज्ञांशी भेट झाली आणि त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले.
त्यानंतर ते लाहोर मधील आली हुजविरी दर्गा येथे काही काळ राहिले. लाहोर वरून ते अजमेरला आले. त्यावेळी अजमेर मध्ये पृथ्वीराज चौहान यांचे राज्य होते. याच दरम्यान मोहम्मद घौरीने केलेल्या आक्रमणात युद्धामध्ये पृथ्वीराज यांचा पराभव झाला आणि त्यानंतर घौरी याने कत्तली केल्या. अजमेरमधील अवस्था पाहून मोईनुद्दीन चिश्ती यांनी लोकांच्या सेवेसाठी अजमेर येथेच घर बनवले आणि शांततेच्या शोधात त्यांनी लोकांची सेवा केली असे सांगितले जाते. त्यांच्या अजमेर येथील निवासस्थानी दररोज लंगर चालू असायचा. येथे हिंदू संत हे देखील येऊ लागले आणि समानता, प्रेम आणि मानवतेच्या गोष्टीवरून मोईनुद्दीन चिस्ती यांना गरीब नवाज अशी पदवी मिळाली.











