अशा घटना बहुदा बिहार आणि उत्तर प्रदेशातीलच असतात. तर आजची ही चक्रवणारी घटना आहे बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथील! येथे एका युवकाला स्वच्छतागृहाच्या दरवाजात पडलेला पाहून पोलिसांनी उचलले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
मग त्याला शिवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी सुरू झाली. आपल्याला शवविच्छेदनासाठी नेणार असे काहीतरी ऐकले आणि तो तरुण स्ट्रेचरवरच उभा राहिला. त्याला उभे राहिलेले पाहून सिव्हिल सर्जन देखील चक्रावून गेले. लोकही घाबरले. मग मात्र त्याला मृत नसतानाही मृत घोषित केल्याचे सर्वांच्या लक्षात आले..
तर त्याचं झालं असं की, बिहार शरीफ येतील रुग्णालयात पहिल्या मजल्यावर स्वच्छतागृहात एक युवक गेला. मात्र सकाळपासून या स्वच्छतागृहाच्या दरवाजा बंद असल्याची माहिती एका सफाई कर्मचाऱ्याने वरिष्ठांना दिली. त्याची माहिती मिळताच वरिष्ठांनी खातरजमा न करता थेट पोलिसांना बोलवले. मग पोलीस आले.
दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला. आतमध्ये एक युवक पालथा पडलेला दिसला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याची नाडी न तपासताच तो मृत झाल्याचे सांगितले. तेवढ्यात याच दवाखान्यातील शल्यचिकित्सक डॉ. जितेंद्र सिंह यांना याची माहिती दिली. त्यांनी देखील त्याला पाहिला आणि नाडी न तपासताच त्याला शिवविच्छेदनासाठी नेण्याचे आदेश दिले.
आता आपल्याला चिरफाड करण्यासाठी नेणार असल्याचे कळताच हा दारुडा युवक भानावर आला आणि त्याने अहो भाऊ, मी जिवंत आहे की असे सांगत स्ट्रेचर वर उभा राहिला. दरम्यान तो मेलेला आहे याची खातरजमा झालेल्या उपस्थित लोकांना मात्र एवढी भीती वाटली की, ते पळून गेले. मग मात्र लक्षात आले तो भरपूर दारू प्यायला होता दारूच्या नशत असल्याने बेशुद्ध होऊन शौचालयात पडला होता पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले अस्थावा जिल्ह्यातील जिरैन गावचा हा युवक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.











