वालचंदनगर : महान्यूज लाईव्ह
आरोपीला शोधायला गेले.. तिथे तर तीन पिस्तूल, दहा काडतूसे, 14 मोबाईल, 9 सुतळी बॉम्ब आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले! वालचंदनगर पोलिसांची कामगिरी!
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हव्या असलेल्या आरोपीच्या मार्गावर गेलेल्या पोलिसांना गुन्हेगारीसाठीच्या शस्त्रसाठ्याचे घबाड सापडले. तब्बल तीन गावठी पिस्तूल, दहा जिवंत काढत असे 14 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल तलवारी व नऊ सुतळी बॉम्ब एवढे साहित्य पोलिसांनी हस्तगत करत एका सराईत गुन्हेगारासह व एका विधीसंघर्षित बालकासह तीन आरोपी ताब्यात घेतले.
या प्रकाराने सगळीकडे खळबळ उडाली असून, गौण खनिज अधिनियम कलम 21 चा 4 व जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशानुसार पोलिसांना हवा असलेला आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके हा वालचंदनगर येथे आला असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरून वालचंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री स्वामी, श्री काटकर, श्री बनसोडे, श्री चितकोटे, श्री चोपणे, श्री सोनवणे, श्री कर्दीक व पोलीस मित्रांनी वालचंदनगर येथील पोस्ट कॉलनीतील डी तीन चाळीत पोलिसांनी धाड टाकली.
यावेळी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके व त्याच्या दोन सातदारा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एकशिव आंबेडकर चौक ता. माळशिरस जि. सोलापूर येथील एकास व एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांकडे मिळून तीन मॅक्झिन सहित गावठी पिस्तूल, एक रिकामी मॅक्झिन 10 जिवंत काडतूसे, 14 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, दोन लोखंडी कटर, एक मूठ असलेली लोखंडी तलवार व एक मूठ नसलेली तलवारीची पात, दोन लोखंडी चाकू व नऊ सुतळी बॉम्ब एवढे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी हे सर्व जप्त केले असून पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत. दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेवर नजर ठेवली असून वालचंदनगर पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले आहे.











