• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळूत रुतलाय सगळ्यांचाच पाय.. सगळेजण मिळून खा..की..!

Maha News Live by Maha News Live
September 23, 2020
in क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
वाळूत रुतलाय सगळ्यांचाच पाय.. सगळेजण मिळून खा..की..!

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचेय? मग लागलीच एक हायवा डंपर घ्या नाहीतर एक ट्रॅक्टर ट्रॉली! घेतली?…ओके..! आता ट्रॅक्टर असेल तर २५ हजार रुपये, ट्रक असेल तर ३० हजार रुपये महिन्याला कार्ड घ्या.. मग महसूलच्या अधिकाऱ्यांना १५ हजार रुपये द्या.. आणि करा बिनधास्त वाळू वाहतूक…व्हा गर्भश्रीमंत.. ढॅण्डढॅण..!

राज्यात वाळूचे लिलाव कुठे झालेत माहितेय का?… इंदापूर तालुक्यात! वर्षात पाच कोटींचा दंडापोटीचा वसूल जिल्हा कोषागारात पाठवला की, महसूलचा डोक्यावरचा ताण हलका होतो..मग कोणीतरी अधिकारी उठून थेट वाळूच विकतो..जर त्यांचे ट्रक पकडले तर पोलिस ठाण्यात हंगामा करतो… पोलिस अधिकारीही गप्प बसतो..का? तर तेदेखील कार्ड- कार्ड खेळतात..ट्रॅक्टरसाठी २५ हजारांचे कार्ड आणि ट्रकसाठी ३० हजारांचे..!

वाळूची तस्करी इंदापूर तालुक्यासाठी आता काही नवीन बाब राहीली नाही. मात्र कष्ट करायचे वाळूचोरांनी आणि चोरावर मोर होणाऱ्यांना पैसे मुबलक मिळतात.. आणि ती तर सरकारी यंत्रणा असते ही त्याहून किळसवाणी बाब.!

सरकारी यंत्रणेचा वाळू चोरीत सहभाग आहे की नाही हे ओळखण्यासाठी काल घडलेला किस्सा पुरेसा आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा काठच्या परिसरातून अवैध वाळूची वाहतूक होत आहे. अगदी रात्रीच कांदलगाव येथे वाळूचा भलामोठा साठा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. बिचाऱ्यांना अजून पोलिस व महसूल यंत्रणेने विचारात व सोबत घेतले नसेल किंवा हे अधिकारी, कर्मचारी खरोखरच वन विभागाच्या हद्दीत काही बरेवाईट घडू न देण्याच्या मानसिकतेचे असतील. पण त्यांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल न झालेला किस्सा असा की, ज्यांना वाळू वाहतूकीचे पोलिस अभय कार्ड नाही त्यांना वाहतुक करु द्यायची नाही असा पायंडा इंदापूर पोलीसांचा आहे. त्यातूनच एखादे वाळूचे वाहन चुकून जात असेल आणि जर पोलीसांच्या निदर्शनास आले तर, लागलीच त्या गाडीला पकडून त्याच्यावर खटला दाखल करण्याची धमकी देत दबाव आणून व्यवहार घडवले जातात.

२१ सप्टेंबर रोजी सरडेवाडी टोल नाका येथे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाई करणाऱ्या एका पोलिसाच्या तीक्ष्ण नजरेने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे वाळूची गाडी हेरली. या गाडीचे रिचार्ज संपले होते. महिना उलटून गेला तरी त्याने मासिक पोलिस अभय कार्ड घेतले नसल्याचे दिसताच त्याने ती गाडी इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणाच्याही नजरेत पडणार नाही अशी आडोश्याला आणून लावली.

सबंधित मालकाला आता मोठा खटला दाखल करणार अशी धमकी त्याने दिली आणि त्यानंतर जे व्हायचे तेच झाले. तोडपाणी ठरून रक्कम ठरली आणि त्याच दिवशी दुपारनंतर ती गाडी सोडून दिली.

दरम्यान काही पत्रकारांना या वाळूच्या ट्रकबाबत सुगावा लागला. त्यांनी मार्केट कमिटीचा भाग पिंजून काढून आडोशाला लावलेली गाडीही शोधून काढली. त्यानंतर सदर गाडीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली देखील. पण बराच वेळ गेल्याने ती गाडी त्याच ठिकाणी आहे का? याची खातरजमा करण्यासाठी बाजार समितीत पाहणी केली असता, ती गाडी त्या ठिकाणी दिसून आली नाही.

इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबत पुन्हा चौकशी केली असता या गाडीबाबत केलेल्या कारवाई ची कसली नोंद नाही असे सांगण्यात आले. तेव्हा मात्र राजाला दिवाळी माहितीच नाही असा प्रकार निदर्शनास आला.

एका वाळू उपसा करणाऱ्याने आमच्याकडून प्रती ट्रॅक्टर 25 हजार रुपये प्रति महीनाप्रमाणे पैसे घेतले जातात. आमच्या ग्रुपचे शंभर ट्रॅक्टर चालू आहेत. ते कार्ड आम्हाला घ्यावेच लागते आणि महिना उलटायच्या आतच रिचार्ज घ्यावे लागते अशी माहिती दिली.

Next Post

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती , विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group