बारामती : महान्यूज लाईव्ह
निरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाले असल्याने बारामती शहराला पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे अशी माहिती नगरपालिकेने दिली असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असून उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने पर्यायाने पाणी पुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार आहे, असेही नगरपालिकेने कळवले असून आज गुरुवार (दि.27) संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा होईल व शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी पाणीपुरवठा होणार नाही असे नगरपालिकेने कळवले आहे.
दरम्यान अशाप्रकारे निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केले असून या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.











