• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशाला जागतिक क्रमांकावर फक्त नरेंद्र मोदीच नेऊ शकतात! मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला साथ द्या!

tdadmin by tdadmin
April 26, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
देशाला जागतिक क्रमांकावर फक्त नरेंद्र मोदीच नेऊ शकतात! मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला साथ द्या!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावनिक साद!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर मधले 370 कलम हटवलं, भव्य दिव्य रामलल्लाचे मंदिर उभं केले. देशाला जागतिक लेव्हला पाचव्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. जगात देशाला तीन क्रमांकावर नेऊन प्रगती पथावर नेण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. ही निवडणूक राहुल गांधी सोनिया गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी, अमित शहा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार त्यांच्या प्रचारार्थ आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा दौंड तालुक्यातील चौफुला (बोरीपार्धी )येथे गुरुवारी (दि. २५) पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी दौंड चे आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, प्रेमसुख कटारिया यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीत होतो. भाजपच्या विरोधात होतो. १९८७ पासून मी काम करत आहे. साहेब सांगतील तसे आजपर्यंत ऐकलं. ते म्हणतात तीच पूर्व दिशा होती. ते म्हणाले युती करा, केली! ते म्हणाले बाहेर पडा, पडलो! तुम्ही जो आदेश दिला, तो पाळला. वडील म्हातारा झाला, तर पोराच्या हातात कारभार देतो. मग आता तुमचे वय झाले आहे, तर माझ्या हातात का दिला नाही ? असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव नाव घेता उपस्थित केला.

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. दहा वर्षात मोदींनी कणखर भूमिका घेत देशाला पुढे नेले आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर 300 युनिट पर्यंत मोफत वीज गरिबांना देणार आहे, 80 कोटी गरिबांना मोफत धान्य दिले आहे. तीन कोटी गोरगरिबांना घरे बांधून देणार आहे. देशाचा विकास झाला, तर राज्याचा विकास होणार आहे. ही निवडणूक बारामतीची नाही तर देशाची आहे. दौंडमध्ये मी बारामतीसारखा विकास करणार आहे.

दौंडमध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणार आहे, रेल्वेचा प्रश्न सोडवणार आहे. मूलभूत रस्ते , उड्डाणपुले तसेच दौंड इंदापूर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मुळशी धरणाचे पाणी शेतीसाठी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आचारसंहिता संपली की तत्काळ ही कामे मार्गी लावणार आहे. असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिला.

आमदार राहुल कुल रडले…

दौंड भाजपचे आमदार राहुल कुल आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांचे वडील स्वर्गीय सुभाष कुल यांची आठवण आल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते काही वेळ भावूक झाले. अजित पवार कुल यांच्या जवळ येत पाठीवर थाप देऊन आधार दिला. आमदार कुल यांनी दौंड मधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना भरघोस मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही कुल यांनी अजित पवार यांना दिली.‌

Next Post
चिमुकली भावंडं खेळता खेळता रस्त्याच्या कडेला जुन्या गाडीत बसली.. गाडी लॉक झाली.. उन्हाचा पारा ४० अंशाचा.. नको तेच घडलं!

चिमुकली भावंडं खेळता खेळता रस्त्याच्या कडेला जुन्या गाडीत बसली.. गाडी लॉक झाली.. उन्हाचा पारा ४० अंशाचा.. नको तेच घडलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group