• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात यांचा पेढ्यांचा हा गोडवा लोकसभेनंतर कायम राहणार का?

tdadmin by tdadmin
April 20, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात यांचा पेढ्यांचा हा गोडवा लोकसभेनंतर कायम राहणार का?

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना पेढा भरून मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. त्यांचा हा पेढा भरवण्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून गावात हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र ह्यापूर्वी इतर निवडणुकांमध्ये एकमेकांवर टीका टिपणी करणारे कुल – थोरात यांचा हा गोडवा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकापर्यंत ही कायम राहणार का ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले खरे, पण विधानसभेला दिलजमाई होणार का ? असे अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. बारामती लोकसभा निवडणुक मतदानाची प्रक्रिया जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या पक्षातील एकमेकांवरील होणारे आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात ही परिस्थिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्यासाठी रात्रीचा दिवस एक केला आहे. त्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे या कट्टर विरोधकांना आपल्या बाजूला खेचण्यास राजकीय खेळी यशस्वी झाली आहे. तशीच खेळी त्यांनी दौंडमध्ये भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात त्यांना एकत्र आणून सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.

आमदार कुल आणि थोरात एकत्र आल्याने दोन्ही गटातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मात्र स्वागत केले आहे. खरंतर हे दोघेही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एकत्रच होते. अजित पवार यांनी यापूर्वीच कुल – थोरात यांना एकत्र आणणे गरजेचे होते. मात्र लोकसभेच्या निमित्ताने का होईना, हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्याने दौंडच्या विकासाला गती येईल अशी अपेक्षा या ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना पेढा भरवत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात हेही उपस्थित होते. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दौंड तालुक्यात हे मात्तबर राजकीय विरोधक एकत्र आल्याने तालुक्यात राजकीय शांतता राहील आणि एकमेकांचे शत्रुत्व संपुष्टात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.

सध्या तरी तालुक्यात हे स्थिर राजकीय चित्र निर्माण झाले आहे. मात्र दुसरीकडे आमदार कुल आणि थोरात यांच्या राजकीय सत्तासंघर्षात अनेक कार्यकर्त्यांचा नाहक बळी मात्र घेतला आहे. तालुक्यातील गावागावात वाड्यावर वस्त्यांवर कुल – थोरात या दोघांना मानणारा निष्ठावंत वर्ग आहे. आपल्या नेत्यांसाठी कोणत्याही आणि काही करायला तयार असणारे हे कार्यकर्ते दोघांकडे पण आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये हेच कार्यकर्ते गावागावात एकमेकांच्या विरोधात भिडले. त्यांच्यावर राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे ही दाखल झाले. परिणामी अनेक कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य तर उध्वस्त झालेच, मात्र काहींना आजही कोर्ट कचऱ्यात हेलपाटे मारावे लागत आहेत.

मानसिक त्रास आणि आर्थिक त्रासही अनेकांना सहन करावा लागला. या दोघांच्या राजकीय सत्ता संघर्षात सर्वात जास्त त्रास आणि नुकसान झाले असेल, ते माजी आमदार थोरात यांच्या कार्यकर्त्यांचे. दौंड तालुका मध्ये सर्वात जास्त काळ सत्तेची सूत्रे ही कुल घराण्याकडे राहिली. रमेश थोरात यांच्याकडे फक्त पाच वर्षेच आमदारकी राहिली. तरीही त्या पाच वर्षात थोरात अनेक कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाहीत अशी खंत गावागावातील अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

आपल्या मुलाच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी रमेश थोरात यांनी राजकीय तडजोड केल्याची चर्चा तालुक्यात आहे. सध्या आमदार कुल आणि थोरात हे जरी एकत्र आले, तरी त्यात मोठे नुकसान हे रमेश थोरात यांचे झाल्याचे चित्र आहे. आमदार कुल यांच्यामागे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. आमदार कुल हे ज्या पक्षात जातील त्या पक्षात कार्यकर्ते ही जातात. कुल यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळी पाठबळ दिले आहे. अनेक कार्यकर्त्यांना कामे दिली आहेत. त्यामुळे कुल हे राष्ट्रवादीत होते, तेव्हाही आणि रासपमध्ये गेले तेव्हाही!

आता ते भाजपमध्ये आहेत, तरीही कुल ह्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मजबूत फळी कायम उभी राहिली आहे. उलट थोरात यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार कुल गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते परिस्थिती बघून या गटात त्या गटात उड्या मारल्याचे चित्र आहे. सध्या लोकसभेच्या निमित्ताने कुल – थोरात एकत्र काम करत असले, तरीही लोकसभेनंतर हे दोघे कायम एकत्र काम करतील ह्याची शाश्वती नाही. दौंड विधानसभेची जागेवर सध्या तरी भाजपचा हक्क आहे, मात्र लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दौंड मध्ये मतांची आघाडी मिळाली तर अजित पवार हे दौंड विधानसभेच्या जागेवर दावा करू शकतात.

तसे झाले तर ते आमदार कुल यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे सध्या एकमेकांना पेढा भरून मनसोक्त गप्पा मारणारे कुल – थोरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतरही एकत्र येऊन मनशोक्त गप्पा मारणार का? एकत्र येऊन दौंडचा विकास करणार का? त्यांची ही राजकीय मैत्री टिकेल का? हे पहावे लागणार आहे.

Next Post
जय हो निवडणूक आयोग! बारामती लोकसभा मतदारसंघात आणखी एका उमेदवाराला तुतारीचा चिन्ह सुप्रिया सुळे यांनी घेतला आक्षेप!

जय हो निवडणूक आयोग! बारामती लोकसभा मतदारसंघात आणखी एका उमेदवाराला तुतारीचा चिन्ह सुप्रिया सुळे यांनी घेतला आक्षेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group