दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वासुंदे येथे हातात धारधार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
दत्तात्रय वामन भगत ( वय २९ रा. वासुंदे ता दौंड जि पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासुंदे येथे बुधवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दत्तात्रय भगत हातामध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरताना असल्याचे पोलीस पाटील निलेश जांबले यांनी सांगितल्याने दौंड पोलीस हवालदार इन्कलाब पठाण, पोलीस नाईक अमीर शेख, पोलीस शिपाई अमोल देवकाते यांनी तत्काळ गावात जाऊन पाहिले.
तेव्हा दत्तात्रय भगत याच्या हातात कोयता असलयाचे निदर्शनास आले. पोलीसांनी त्याला घेतले. त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार इन्कलाब पठाण यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली.











