मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या अर्थ खात्याने घातलेली अट एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानंतर मागे घेण्यात आली त्यामुळेहर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चार कारखान्यांचा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील काही साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम अंतर्गत म्हणजेच एनसीडीसी कडून कर्ज मंजूर करण्यात आले आहे. मात्र हे कर्ज मंजूर होताना केंद्र सरकारने एनसीडीसीचा संचालक घेण्यासंदर्भासह काही अटी घातलेल्या आहेत, तर हे कर्ज देताना राज्य सरकारने देखील या कारखान्यांच्या कर्जासाठी कारखान्यांच्या जागेच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढवावा व कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे अशी अट घातली होती.
या अटीमुळे या कारखान्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग दुरापास्त झाला होता. यावरून रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि काही तासातच ही अट मागे घेण्यात आली.











