दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील इटरनिस फाईल केमिकल्स लिमिटेड ह्या कंपनी मधून ५ कोटीपेक्षा जास्त किंमतीचे रेडियम ऑन अॅल्युमिना नावाचे कॅटिलिस्ट ( केमिकल ) ची चोरीला झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी राहुल बाळासाहेब काळे ( वय ३९, अहमदनगर ), अंकीत वसंतराव जाधव ( वय २४, रा.रोटी ), श्याम प्रदिप इंगोले ( वय २१ मुरखेड ), महेश तात्यासाहेब गायकवाड ( वय ३४, रा.कुरकुंभ), गोकुळ महादेव धुमाळ ( वय ३९,रा. मुर्टी. बारामती ), मल्लिकाअर्जुन विठ्ठल खेडगी (वय ३१ रा.काशिमिरा ठाणे), डब्बू ऊर्फ भगेलु कहार ( वय ३१ राहणार उत्तर प्रदेश), उदयराज श्रीराम यादव (वय 60, मुंबई), विष्णू मच्छिंद्र विटकर ( रा. मोरे वस्ती, दौंड) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी विष्णू बाजीराव डुबे यांनी फिर्याद दिल्याने १६ मार्च रोजी अज्ञात चोरांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान दौंड पोलिसांनी अवघ्या अकरा दिवसात नऊ आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील लोंढे हे तपास करीत होते. त्यांच्या तपासासाठी तीन पथके तैनात करण्यात आली होती.अखेर या पथकाला अवघ्या दहा दिवसांच्या आत चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना सोमवारी दौंड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. दरम्यान,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, सतीश राऊत, सहाय्यक फौजदार अनिल कोळेकर,पोलीस हवालदार दिलीप भाकरे, शंकर वाघमारे, पांडुरंग थोरात, सुभाष राऊत, श्रीरंग शिंदे, पोलीस नाईक राकेश फाळके, अमोल गवळी, महेश पवार, सचिन बोराडे, पोलीस शिपाई अमोल राऊत, अमोल देवकाते, योगेश गोलांडे, रवींद्र काळे आदींच्या पथकाने ही टोळी जेरबंद केली.











