• Contact us
  • About us
Sunday, June 21, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘छत्रपती’चा गेली अठरा वर्षे शून्याकडं नेणारा कारभार! सभासदांनी भावी पिढीसाठी सावध व्हावे! या अनागोंदी कारभारावर कोठेही, कोणाशीही चर्चा करण्याची तयारी!

Maha News Live by Maha News Live
December 11, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

इंदापूर  : महान्यूज लाईव्ह

छत्रपती सहकारी साखर कारखान्यात गेली 18 वर्षे प्रगती कडून शुन्याकडे नेणारा कारभार सुरू आहे. सभासद बंधूंनी आपल्या प्रपंच आणि भावी पिढीसाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपण करत असलेल्या कोणत्याही आरोपासंदर्भात चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावं. मदतीसाठी आवश्यकता असल्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ञांची सुद्धा मदत घ्यावी, परंतु यांच्या कारभारासंदर्भात कोणाशीही, कोठेही, कधीही समोरासमोर चर्चा करण्याची आपली तयारी आहे असे आव्हान छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आज संचालक मंडळाला दिले.

कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी छत्रपती कारखाना संदर्भात आज एक पत्रक प्रसिद्धीस दिले आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांचे काहूर माजले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाचक म्हणतात, ‘छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी उसाची लागवड ही स्वतःच्या प्रपंच यासाठी करावी का संचालक मंडळासाठी याचा विचार करण्याची वेळ आली आहे’ हे सांगत असतानाच त्यांनी छत्रपती कारखान्याचे संचालक यांच्या कारभारावर कोरडे ओढले आहेत.

जाचक यांनी नमूद केले आहे की गळीत हंगाम चालू झाल्यानंतर 47 दिवसांनंतर संचालक मंडळाने 2200 रुपये प्रति टन याप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला. कारखान्याची एफआरपी अंदाजे प्रतिटनी 2515 रुपये होत असताना केवळ 2200 रुपये प्रति देऊन व त्यातून शेअर्सची दोन हजार रुपये प्रतिदिन प्रमाणे रक्कम वसूल केले आहे असे समजते. उसाची एफआरपी वेळेत द्यायची नाही; त्यावरचे कायद्याप्रमाणे व्याज द्यायचे नाही व उलट वरती शेअर्स रकमेची कपात करायची; हे कुठल्या व्यवहारात बसते?

सभासदांची एक कोटी 73 लाख इतकी परतीची ठेव मुदत संपून दोन वर्षे लोटली असताना संचालक मंडळाने अद्याप दिलेली नाही. यावरून संचालक मंडळ ऊस उत्पादकांचे प्रतिनिधित्व करते की, बिगर ऊस उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करते हेच समजत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाने व सहकारी विकास सोसायट्या या एकमेकांच्या व्यवहाराला पूरक अशा संस्था आहेत. मग ज्या सहकारी साखर कारखान्याकडून जिल्हा बँकांना कोट्यवधींचा नफा मिळतो, त्या कारखान्याच्या साखरेवर उचल देण्यास काय अडचण आहे?

बँकेची उचल पोत्यावर मिळते व ती सभासदांना टनावर देण्याची पद्धत आहे. व संचालक मंडळ हे ऊस उत्पादकांचे कारभारी असल्यामुळे त्यांनी एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे व त्यांना त्यासाठीच निवडून दिलेले असते. साखर व मळीचे भविष्यातील धोरण याचा अभ्यास न करता केलेली ऍडव्हान्स विक्री निश्चितच तोट्याची ठरली आहे. माळेगाव कारखान्याचे नुकतीच कच्ची साखर 3190 प्रति क्‍विंटल दराने विकली असताना छत्रपती च्या संचालक मंडळाने 3100 रुपये प्रति क्विंटल या दराने विकली आहे. याला जबाबदार कोण?

ऑनलाइन टेंडर चे कारण सांगून खरीदार पुढे येतच नाहीत व अद्याप साखर कोणी घेतली हे गुलदस्त्यातच आहे. तयार झालेली कच्ची साखर अद्याप गोडाऊन मध्येच आहे‌. मग कच्ची साखर विकून व्याजाचा पर्यायाने कारखाना व संस्थांचा काय नेमका फायदा झाला? ऍडव्हान्स साखर व मळी विक्री करण्याऐवजी सभासदांकडून काही काळापुरत्या ठेवी घेतल्या असत्या, तरी कारखान्याचे नुकसान झाले नसते.

कारखान्याचे काल अखेर 2 लाख 93 हजार 552 मेट्रिक टन एवढी गाळप झाले आहे. सदर गाळप झाले आहे, म्हणजेच प्रति दिन सरासरी 6 हजार 245 टन एवढे गाळप झाले आहे. व गेटकेन आजपर्यंत 90 हजार टन गाळप झाले आहे, म्हणजेच प्रति दिवशी सरासरी 1914 टन इतके झाले आहे. कारखाना सभासदांसाठी वाढवलेला आहे व सध्या थंड हवामानामुळे उसाला तुरे येऊ लागले आहेत व त्यामुळे उसाचे वजन घटणार आहे.

सभासदांचा ऊस उशीरा तुटल्यावर नुकसान होणार आहे. मग गेटकेन घेण्याचा अट्टाहास संचालकांच्या व बगलबच्चांच्या वाहनांना काम मिळते मिळावे म्हणूनच आहे का? कारखान्याने एका दिवसात 9133 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केल्याचा दावा केला आहे. सदर दिवशी उच्चांक असा केला गेला, याचे विश्लेषण सविस्तरपणे योग्य ते व्यासपीठावर करू.

अर्थात खरेतर कच्ची साखर त्वरित बाहेर गेली व गेटकेन बंद करून सभासदांचे ऊस गाळप केला तर गेटकेनला होणारा प्रतिटनी 350 रुपये खर्च वाचेल. साखरेचा उतारा वाढेल व सभासदांना एक उसाची एफआरपी देता येईल असा शेतकरी कृती समितीच्या ठाम विश्वास आहे. गळीत हंगाम चालू झाल्यापासून अपेक्षित वीज उत्पादन सुद्धा झालेले नाही. छत्रपती कारखान्याचा कारभार असाच गेली अठरा वर्षे नियोजन शून्य असून सभासद बंधूंनी आपल्या प्रपंचासाठी, पिढीसाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. असे जाचक यांनी म्हटले आहे.

Next Post

७८ टक्के फक्त जाहिरातीवर खर्च करून " बेटी बचाओ, बेटी पढाओ "! संसदीय समितीची नाराजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group