महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यातील दहावी व बारावीच्या निकालाबाबत भाष्य करताना दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैपर्यंत जाहीर होणार असल्याचे सांगितले.
देशातील आयसीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार असल्याने राज्यातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र दहावी, बारावीच्या पेपर तपासण्यासाठी विलंब झाल्याने राज्यातील दहावी, बारावीचे निकाल लांबणीवर पडले आहेत. साहजिकच करिअरच्या निश्चित दिशा ठरविण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनाही गैरसोयीचे बनू लागले आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर दहावीला देखील १८ लाखांपर्यंत विद्यार्थी बसले होते.










