
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड मध्ये एका व्यक्तीला कोरोना ची लागण झाल्याने दौंडची पाठ कोरोना सोडायला तयार नाही हेच जणू स्पष्ट झाले.
या व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेचा चा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आल्याची माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डाॅक्टर तुकाराम बनसोडे यांनी दिली.
ही व्यक्ती पुणे महानगर पालिकेची कर्मचारी असून रोज पुण्यावरून ये जा करीत आहे, या व्यक्तीस त्रास होवू लागल्याने खासगीप्रयोगशाळेत कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ती व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली.
दरम्यान दौंड च्या ग्रामीण भागात खुटबाव, केडगाव, बोरीपार्धी, पाटस नंतर आता वरवंड मध्येही कोरोनाचा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे, दरम्यान हा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल असून शासकीयप्रयोगशाळेमध्ये देखील कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर अशोक रासगे यांनी दिली.











