इंदापूर : महान्युज लाईव्ह
इंदापुरात पुन्हा आज एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला.
इंदापुरात सोलापुरातून आलेला रुग्ण सापडल्यानंतर शहरात पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती. आज पुन्हा नव्याने एक रुग्ण आढळल्याने इंदापूर शहरातील रुग्णांची संख्या दोन वर पोहोचली आहे.
पेशाने वकील असलेल्या व्यक्तीस व त्यांच्या पत्नीस दोन दिवसापासून त्रास होत असल्याने व कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने वैद्यकीय विभागाने त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. यामध्ये वकिलांचा अहवाल निगेटिव्ह आला, मात्र त्यांच्या पत्नीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.












