प्रविण माने यांनी दाखवला हिरवा झेंडा
इंदापूर : महान्यूज लाईव्ह

गोखळी (ता. इंदापूर ) येथील सोनाई पशुखाद्य कारखान्याचा सोनाई पशु आहार घेवून इंदापूर एस.टी बस आगाराची बस आज परांडा तालुक्यातील भूमकडे रवाना झाली. सोनाई उद्योग समुहाचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला.
प्रविण माने म्हणाले, तीन महिन्यानंतर एसटी बस सुरु होत आहे. लवकरच नागरी जीवन ही पूर्वपदावर येईल. कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता देश हळूहळू बाहेर पडतो आहे. राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने दैनंदिन आयुष्य सुरू करत असताना खबरदारी बाळगून सर्व गावगाडा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. प्रवाश्यांची दिवसरात्र सेवा करणारी लालपरी म्हणजेच आपली एसटी बस गेले तीन महिने बंद होती. आता एसटी बसची माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. आता सर्वच गोष्टी पूर्वपदावर येतील.
यावेळी सोनाई ग्रुपचे संचालक किशोर माने, राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी, विभागीय भांडार अधिकारी श्री. गायकवाड , आगार व्यवस्थापक महेबुब मनेर, नगरसेवक पोपट शिंदे, सुनील शिंगटे, वाहतूक निरीक्षक गुलाब मस्के, वाहतूक नियंत्रक शिवाजी बंडलकर, लेखनिक विजय गवळी, लखन भोंग, संदीप हेगडे, महेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.










