• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम! अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये बैठक! रिंग रोड लादला तर हायवे रोखण्याचा इशारा!

Maha News Live by Maha News Live
June 13, 2021
in सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

विशाल कदम : महान्यूज लाईव्ह

उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ, वळती, शिंदवणे, पेठ, व परिसरातील गावांमधील शेतकर्‍यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडला तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित रिंगरोड जर शेतकर्‍यांच्या शेतातून गेला तर पुणे – सोलापूर महामार्ग अडविण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी पूर्व हवेलीतील शेतकर्‍यांनी दिला.

कोरेगाव मूळ आणि शिंदवणे (ता. हवेली) येथे प्रकल्पबाधित शेतकर्‍यांची आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात रविवारी (ता. १३ ) संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, एमएसआरडीसीचे अभियंता संदीप पाटील, हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते, अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे, आणि मंडलधिकारी दीपक चव्हाण उपस्थित होते. यासभेमध्ये पूर्व हवेलीतील शेतकर्‍यांनी एमएसआरडीसीच्या रिंगरोड च्या संदर्भात विरोधाची आक्रमक भूमिका मांडली.

प्रशासकीय अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना रिंगरोडची माहिती व भूसंपादनाची प्रक्रिया या संदर्भात जमलेल्या शेतकर्‍यांना माहिती दिली. यावेळी रिंगरोडला विरोध दर्शविणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचनींचे निरसण करण्यात आले. तसेच पूर्व हवेलीतील भूसंपादनाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट रस्ते विकास महामंडळाने करण्याचे ठरविले आहे. परंतु प्रशासनाने शेतकर्‍यांना विश्वासात न घेता फेरफारवर नोंद केल्यामुळे रिंगरोडला काही शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला.

याबाबत अधिक माहिती देताना बारवकर म्हणाले की, एमएसआरडीसीच्या रिंगरोड
भूसंपादनाच्या प्रक्रियाला शेतकर्‍यांनी सहकार्य करावे. जे शेतकरी भूसंपादन प्रक्रियाला विरोध दर्शवतील त्यांना रेडिरेकनरच्या चारपट मोबदला दिला जाणार आहे. आणि विरोध न दर्शविणार्‍या शेतकर्‍यांना पाचपट मोबदला देण्यात येणार असल्याचे हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी संगितले.

यावेळी पेठचे सरपंच सूरज चौधरी, शिंदवणे गावाचे माजी सरपंच आण्णा महाडीक, जनार्दन कुंजीर, प्रभाकर चौधरी, गोकुळ कुंजीर, संदीप कानकाटे, मारुती चौधरी, पेठचे सरपंच सूरज चौधरी, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनीषा कड, अशोक इनामदार, दिलीप शितोळे, बापू शितोळे, विठ्ठल कोलते, भानूदास जेथे, रघुनाथ चौधरी, पोलिस पाटील वर्षा कड, दत्तात्रय चौधरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पूर्व हवेलीतून एमएसआरडीसीचा रिंगरोड सुमारे १०३ किलोमीटर लांबीचा रिंग रोड तब्बल ८२५ हेक्टर जागेमधून जाणार आहे. परंतु, पूर्व हवेलीतून याअगोदरच पी.एम.आर.डी.ए. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने असे दोन रिंगरोड प्रस्तावित केले आहेत. ते दोन्ही रस्ते सुरू झाल्यास या तिसर्‍या रिंगरोडची गरज पडणार नाही. असे काही शेतकऱ्यांनी या चर्चेत बोलताना आपले मत मांडले.

Next Post

बैलगाड्या शर्यतीचं काय फॅड आलंय? दर आठवड्याला होतोय एक गुन्हा दाखल; तरीही बैलगाड्यांच्या बेकायदेशीर शर्यती! पळशीत 13 जणांवर गुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group