सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : तालुक्यातील गोरगरीब रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करुन त्यांना मानसिक आधार देवून रुग्ण सेवा देणारे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या कोरोना च्या काळात अशा वैद्यकीय अधिका-यांची नितांत गरज असून रुग्णसेवेसाठी सेवेसाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ.एकनाथ चंदनशिवे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सन 2006 पासून कार्यरत आहेत.31 मे रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेवर त्यांनी योग्य पद्धतीने उपचार करणे, त्यांना आधार देणे व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता रुग्णांना उपचार करत आहेत. इंदापूरात लोकप्रिय डॉक्टर म्हणून डॉ. चंदनशिवे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर उपचारांची गरज आहे. कोरोना सारख्या महाभयंकर काळात त्यांनी आपली सेवा अतिशय चोखपणे पार पाडली आहे.
कोरोना च्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय उपचारांबरोबरच मानसिक आधार देणे तसेच त्यांच्याशी सौजन्याने वागणे देखील महत्वाचे आहे. त्यांच्या सृर्जनशील वागण्यामुळे कोरोना रुग्णांची मनोबल वाढत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात येईपर्यंत या सर्व बाबीचा विचार करून त्यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्य कडे जगताप यांनी केली. निवेदनावर प्रदेश संपर्कप्रमुख हनुमंत घोडके, इंदापूर तालुका अध्यक्ष विनोद कुलथे यांच्या सह्या आहेत. निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे..











