औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
करमाळा : पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करमाळा यांनी अवैध दारू विक्रीविरुद्ध कारवाई केली.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहितीदाराकडून करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंदर या गावात काही लोक अवैध दारू विक्री करत आहेत अशी माहिती मिळाली.
त्यावरून कोकणे यांनी पोलिस उपनिरीक्षक तानाजी पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर, पोलीस कॉन्स्टेबल व्यवहारे ,जगदाळे, ढवळे महिला पोलिस कॉन्स्टेबल घोडे यांचे पथक रवाना केले.
या पथकाने कंदर गावात विनापरवानगी दारूविक्री सहा ठिकाणी धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. ह कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.











