• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हर घडी बदल रही है रुप जिंदगी…. बारामतीत रंगली ऑनलाईन बासरीवादनाची मैफल

Maha News Live by Maha News Live
April 28, 2020
in मनोरंजन, राजकीय, पुणे
0
हर घडी बदल रही है रुप जिंदगी….          बारामतीत रंगली ऑनलाईन बासरीवादनाची मैफल

बारामती : महान्यूज लाईव्ह

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सारेच घरी बसलेत…आणि तरीदेखील सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहेत… अशावेळी झूम अॅपच्या माध्यमातून आज बारामतीत सांजवेळी मैफल अवतरली..आणि बासरीवादक हिमांशू बक्शी यांनी सादर केलेल्या सांज ये गोकुळीने पुन्हा एकदा शहरात आलेल्या व घरबंद झालेल्या सर्वांच्या नजरेसमोर समृध्द `गावगाडा` अवतरला..त्याचवेळी `हर घडी बदल रही है रुप जिंदगी` चे सूर कानी पडताच पुन्हा एकदा जगभरातले कोरोनामुळे पालटलेले रुप डोळ्यासमोर आले..!

 आज संध्याकाळी सहा वाजता स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कोकरे यांच्या पुढाकारातून `लॉकडाऊन मीट` या व्हाटसअप ग्रुपमधील सहकाऱ्यांसाठी ही अनोखी मैफल आयोजित करण्यात आली. सध्या व्याख्यानमालांपासून ते वेगवेगळे संवाद फेसबुक, झुम अॅपवरून सुरू आहेत. अशावेळी साहित्याची, कवितांची, गाण्यांची रुची असलेले तरी मागे कसे राहतील..किंबहूना त्यांना ही बौध्दीक, मनोरंजक मेजवानी मिळण्यासाठीच सध्या बारामतीत हा ग्रुप कार्यरत आहे.

कोरोनाने देऊळबंद केलंय, घरबंद केलेल्या माणसांसाठी हिमांशू  `किसी की मुस्कराहटो पे हो निसार` हे राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणे सादर करीत होते, तेव्हा बारामतीच्या साहित्यनगरीतील ही मैफल एकमेकांना आधार देण्यासाठी पुरेशी असल्याचा भास निर्माण झाला..हिमांशू यांच्या बासरीवादनाने “तुमसेही दिन होता है..सूरमयी शाम आती है..तुमसेही तुमसेही` जाने जां ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ` सारख्या प्रेमगीतांपासून ते `विठ्ठला तू वेडा कुंभार` सारख्या भावगीतांपर्यंत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली..बारामतीत ही मैफल दररोज संध्याकाळी होणार असल्याचे डॉ. कोकरे यांनी सांगितले.

हिमांशू सांगत होते,` वडीलही गायक होते. मात्र त्यांना मार्गदर्शन मिळाले नाही, मला मात्र राजेंद्र कुलकर्णी यांनी शिकवले. सध्या मी शास्त्रीय संगीत शिकतो आहे.` 

Next Post
भिगवण स्टेशनच्या  ११ जणांची कोरोना चाचणी राज्यमंत्री भरणे यांची भिगवणला भेट

भिगवण स्टेशनच्या ११ जणांची कोरोना चाचणी राज्यमंत्री भरणे यांची भिगवणला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group