• Contact us
  • About us
Tuesday, October 20, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवबौद्धांना केंद्र शासनाच्या सवलतींचा फायदा मिळावा यासाठी शासन सकारात्मक : धनंजय मुंडे

Maha News Live by Maha News Live
March 14, 2020
in मुंबई, राष्ट्रीय, राजकीय, राज्य
0
नवबौद्धांना केंद्र शासनाच्या सवलतींचा फायदा मिळावा यासाठी शासन सकारात्मक : धनंजय मुंडे

विशेष बैठक घेऊन निर्णय करणार

मुंबई : महान्यूज लाईव्ह

राज्यातील धर्मांतरीत अनुसूचीत जातीतील नवबौद्धांना केंद्र शासनाच्या सवलतींचा फायदा मिळावा यासाठी शासन सकारात्मक आहे.कोणावरही अन्याय न करता सर्वांना न्याय मिळावा यासाठी या विषयातील तज्ञ आणि कार्यकर्ते यांची एकत्रीत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. असे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य भाई गिरकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

                श्री. मुंडे पुढे म्हणाले,  सध्या धर्मांतरीत लोकांना देशात कुठेही  सवलती घेता येत नाहीत मात्र, राज्यातील सवलती त्यांना लागू आहेत. याविषयाची पार्श्वभूमी त्यांनी यावेळी विस्ताराने विषद केली. ते म्हणाले, अनुसुचित जातीमधून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्यांना अनुसुचित जातीचा दर्जा मिळावा या हेतुने केंद्र शासनाने सन 1990 मध्ये कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार अनुसुचित जातीची यादी हिंदू, शिख यांच्यासह बौद्ध धर्मियांनाही लागू झाली आहे.

अनुसुचित जातीतील धर्मांतरीत लोकांना नमुना सहा मध्ये केंद्राच्या निर्देशांप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते तर राज्य शासन नमुना 7  मध्ये प्रमाणपत्र देते. या नमुना 7 च्या प्रमाणपत्राच्या आधारावर राज्यातील सवलतींचा लाभ घेता येतो.  सध्या महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र देण्याचे काम व जिल्हा जात प्रामाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज हे सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.23 तसेच त्याअंतर्गत पारित केलेले नियम -2012, मधील तरतूदींनुसार तसेच मा.सर्वोच्च न्यायालय मा. उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार चालते.

       या  नियमातील नियम क्र. 5 (6) मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र राज्यातील बौद्ध धर्मांतरीत अर्जदारांना नमुना 7 मध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीसाठीचे सर्व आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय होतात. परंतू केंद्र शासनाच्या लाभांसाठी सदर नमुना 7 मध्ये असलेले जातीचे प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या विविध विभागाकडून स्वीकृत होत नसल्याने बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जातींच्या व्यक्तीवर अन्याय होतो. त्यांना केंद्र शासनाच्या आरक्षणाच्या योजेपासून वंचित राहावे लागते.

केंद्र शासनाच्या विहीत लाभासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2012 विहीत केलेल्या नमुना नं.7 वर असलेले जात प्रमाणपत्र केंद्र शासनाने स्वीकृत करण्यासाठी शासन स्तरावरुन केंद्र शासनास प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावावर विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेतले होते. त्यानंतर दि.17.11.2017 अन्वये केंद्र शासनाने विहीत केलेल्या जातीच्या दाखल्याच्या नमुन्यातच अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मांतरीत व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कळविले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनास विनंती करण्यापुर्वी सर्व बाबींची तपासणी करून, सविस्तर बैठक घेऊन आणि विचार विनिमय करुन निर्णय घेण्यात येईल असेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीवरिल चर्चेत सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये आदिंनी सहभाग नोंदविला.

Tags: Budget SessionDhananjay MundeMahavikas AaghadiSocial Justice
Next Post
#CORONA_VIRUS “कोरोना” प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी जागृती करावी : डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

#CORONA_VIRUS "कोरोना" प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी जागृती करावी : डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group