• Contact us
  • About us
Tuesday, October 20, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटील यांचेकडून इंदापूर शहरातील पूर परिस्थितीची पाहणी; शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी

Maha News Live by Maha News Live
October 15, 2020
in सामाजिक, शेती शिवार, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
हर्षवर्धन पाटील यांचेकडून इंदापूर शहरातील पूर परिस्थितीची पाहणी; शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी

इंदापूर : महान्यूज लाईव्ह 

इंदापूर शहरात बुधवारी (दि. 14 ऑक्टो.) मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक भागात, घरामध्ये, दुकानांमध्ये, पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज गुरुवारी (दि.15) या भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. शासनाने नुकसानीचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा तात्काळ मदत करावी,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले,’ काल दिवसभर व रात्री इंदापूर शहरात व तालुक्यांमध्ये आकडेवारीनुसार सुमारे 166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर तालुक्यात आज पर्यंत एवढा कधीही पाऊस झाला नव्हता. या मोठ्या पावसाने रस्ते वाहून गेले, अनेक घरात, दुकानात पाणी शिरले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. संपूर्ण दळणवळण ठप्प झाले आहे. अजूनही पाणी येत आहे. तातडीची परिस्थिती निर्माण झाली आह. त्यामुळे आमची सरकारला आणि प्रशासनाला मागणी आहे की बाधित कुटुंबांना मदत दिली पाहिजे. वेळ न लावता ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. अनेकांना राहायला जागा नाही,अशी परिस्थिती आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेत जमीन वाहून गेली आहे. पिके वाहून गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी काढलेले धान्य देखील खराब झाले आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उभारलेले शेततळे वाहून गेली आहेत. पाझर तळे फुटले आहेत.अगोदरच शेतकरी हैराण झाला होता. त्यात या संकटामुळे त्याचे अजुन अधिक नुकसान झाले आहे. 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी म्हणून जाहीर केली जाते. आता त्यापेक्षा काल दुप्पट पाऊस झाल्याने प्रशासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका या सर्वांनी या कामांमध्ये मदत केली पाहिजे.

हवामान खात्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची, निवाऱ्याची अन्नधान्याची व्यवस्था केली जाईल. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. सामान्य नागरिकांना या समस्येतून दिलासा देण्याचे काम करावे. इंदापूर नगरपालिका नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देत आहे. छोट्या दुकानदारांना मदतीची आवश्यकता असेही त्यांनी सांगितले. 


यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन, नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते नगरसेवक कैलास कदम, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी नगरसेवक गणेश महाजन, शेखर पाटील, पांडुरंग शिंदे, तसेच गुड्डू मोमीन, प्रशांत उंबरे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यावेळी उपस्थित होते.

Tags: Farmers in Troubleharshwardhan patilIndapurRain in Maharashtra
Next Post

कोरोनाने आधी रोजगार हिरावला; अन पावसाने घराचं घरपण..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group