• Contact us
  • About us
Friday, November 27, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रणरागिणींच्या नेतृत्वात सह्याद्रीच्या छातीवर शिवदुर्गचा भगवा फडकला; कर्नाळा गडावर १०७ वी मोहीम फत्ते!

mahaanewslive by mahaanewslive
October 10, 2026
in यशोगाथा, सामाजिक, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पर्यावरण, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
रणरागिणींच्या नेतृत्वात सह्याद्रीच्या छातीवर शिवदुर्गचा भगवा फडकला; कर्नाळा गडावर १०७ वी मोहीम फत्ते!

​ऐतिहासिक शिरढोणच्या भूमीत आद्यक्रांतिकारकांच्या चरणी लीन; शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा दुर्गसंवर्धनाचा संकल्प

रामभाऊ जगताप, कार्यकारी संपादक, महान्यूज

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पराक्रमाची धगधगती साक्ष देणाऱ्या सह्याद्रीच्या उत्तुंग कडेकपारीत गडकिल्ले संवर्धनाचा जागर मांडणाऱ्या ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ परिवाराने आपल्या दुर्गभ्रमंतीची १०७ वी मोहीम रायगड जिल्ह्यातील अजिंक्य अशा ‘कर्नाळा’ गडावर मोठ्या दिमाखात फत्ते केली. महाराष्ट्राच्या दुर्गसंवर्धन विश्वात विश्वासाचे अधिष्ठान निर्माण करणाऱ्या या संस्थेच्या मोहिमेत पुणे, अहिल्यानगर, सातारा व जळगाव या मुलुखांतील शिवप्रेमी दुर्गमावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

​या मोहिमेचे ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या पाषाणावर शिवकालीन रणरागिणींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. संस्थेच्या इतिहासात प्रथमच मोहिमेचे सेनापतीपद (मोहीम प्रमुख) तारा चांदगुडे, सुचित्रा दळवी आणि सुप्रिया कुदांडे या रणरागिणींकडे सोपवण्यात आले होते. शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या रणरागिणींनी अत्यंत खडतर, दुर्गम अशा वाटांवरून मोहीम यशस्वीरीत्या पार पाडत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर स्त्रीशक्तीचा अनोखा ठसा उमटवला.

​मोहिमेची सुरुवात कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या घनदाट अरण्यवाटेने निसर्गाची अनुभूती घेत झाली. गडावर पारंपरिक पद्धतीने दुर्गपूजन करून सह्याद्रीच्या पाषाणाला वंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजेश इंगळे व तारा चांदगुडे यांनी गडाचा धगधगता इतिहास, भौगोलिक महत्त्व व रणनीती यावर प्रकाश टाकला. गडांवर केवळ सहल म्हणून न भटकता, हा जाज्वल्य ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जतन करणे आणि दुर्गसंवर्धनाचे व्रत अंगीकारणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

​कर्नाळा गडाचे शेवटचे किल्लेदार हे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होते, हा ऐतिहासिक धागा पकडून सर्व मावळ्यांनी फडके यांचे जन्मस्थळ असलेल्या शिरढोण येथील ऐतिहासिक वाड्यास अत्यंत आदराने भेट दिली. ज्या भूमीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिले बंड पुकारले, त्या पवित्र क्रांतीभूमीत नतमस्तक होऊन शिवदुर्ग परिवाराने राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घेतली.

​सहकुटुंब सहपरिवार, लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनीच या ऐतिहासिक मोहिमेत खांद्याला खांदा लावून भाग घेतला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गणेश कुदांडे, अजित दळवी, संकेत नलगे, अमोल बडे, ॲड. गोरख कडूस, रमेश चांदगुडे, संदीप गवळी, अक्षय ओहळ, सागर शिंदे, प्रदीप परकाळे, अशोक गदादे, प्रा. अमर भोसले, निखिल ढवळे, दिनेश अडसूळ, आमिर शेख, मिठू लंके, अनिल जगदाळे, नामदेव आढाव, विजया लंके, डॉ. अर्चना वाघमोरे, स्वाती मुळे, कांचन दरेकर या मावळ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Next Post

पाटसमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचा धक्कादायक प्रकार! दस्त रद्द करून फौजदारी कारवाईची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group