• Contact us
  • About us
Friday, November 6, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँकेच्या व्यासपीठावर जुळले ‘राजकीय सूर’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने चर्चांना उधाण! लिफ्टमधील एकत्र प्रवेशापासून चाफ्याच्या फुलापर्यंत अनोखे चित्र!

mahaanewslive by mahaanewslive
August 30, 2026
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
जिल्हा बँकेच्या व्यासपीठावर जुळले ‘राजकीय सूर’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने चर्चांना उधाण! लिफ्टमधील एकत्र प्रवेशापासून चाफ्याच्या फुलापर्यंत अनोखे चित्र!

दौलतराव पिसाळ, सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली; मात्र बँकेच्या कारभारापेक्षा सभेच्या निमित्ताने समोर आलेल्या राजकीय चित्राचीच जिल्ह्यात अधिक चर्चा रंगली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे दोन प्रमुख राजकीय चेहरे एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांच्यातील सलोख्याचे दर्शन घडल्याने जिल्ह्याच्या राजकारणात त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

दोन्ही नेत्यांची व्यासपीठाकडे झालेली एकत्रित ‘एन्ट्री’ विशेष लक्षवेधी ठरली. लिफ्टमधून दोघे सोबत आल्याचे दृश्य उपस्थितांच्या नजरेत भरले. त्यानंतर व्यासपीठावर पोहोचल्यावर उदयनराजेंनी आपल्याकडील चाफ्याचे फूल रामराजेंना दिले. दोघेही शेजारी बसले आणि पुढील बराच वेळ त्यांच्यातील गप्पा, हास्यविनोद आणि अनौपचारिक संवाद सुरू राहिला. त्यामुळे बँकेच्या सभेतील राजकीय ‘मूड’ जाणून घेण्यासाठी उपस्थितांचे लक्ष वारंवार या दोन्ही नेत्यांकडे वळत होते.

रामराजेंच्या मिश्कील वक्तव्याने सभागृहात हशा..
सभेतील आपल्या भाषणात रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंचा उल्लेख करत वातावरण आणखी हलकेफुलके केले. बँकेचे सरव्यवस्थापक सरकाळे यांनी खासदार उदयनराजे यांच्याकडून बँकेच्या कामकाजाला कोणताही त्रास नसल्याचे सांगितले होते. त्यावर रामराजेंनी आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत, “त्यांचा बँकेला त्रास नसला, तरी ते नुसते दिसले तरी त्रास होतो,” अशी टिप्पणी केली. या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला.

उदयनराजेंबाबत बोलण्याचा आपला अधिकार आणि ज्येष्ठत्वाचा संदर्भ देत रामराजेंनी दोन्ही कुटुंबांमधील राजकीय संबंधांची एक वेगळीच छटा सभागृहासमोर आणल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजेंनी केलेले भाष्य अधिक महत्त्वाचे ठरले. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मला भीती नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी जिल्हा बँकेची देशातील ‘ब्रँड बँक’ अशी ओळख असल्याचे नमूद केले.

निवडणुकीच्या रणधुमाळीत सभासदांची पळवापळवी होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सध्याचे संचालक मंडळ कायम राहावे, अशी काही सभासदांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बँकेच्या आगामी निवडणुकीत सध्याची राजकीय समीकरणे कायम राहणार की नव्या आघाड्या आकाराला येणार, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.

‘जिल्हा बँक’ ठरणार राजकीय शक्तिपरीक्षेचे व्यासपीठ?
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती बँकेला केवळ आर्थिक संस्था म्हणून नव्हे, तर ग्रामीण भागातील राजकीय प्रभावाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या आधी बँकेच्या व्यासपीठावर दोन प्रभावशाली नेत्यांमध्ये दिसलेला सुसंवाद राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करण्यासारखा नाही. विशेषतः उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील सार्वजनिक संवाद, एकत्रित प्रवेश, चाफ्याच्या फुलाची देवाणघेवाण आणि सभेदरम्यानचा अनौपचारिक संवाद यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

सभेचा विषय सहकार आणि बँकेच्या कारभाराचा असला, तरी प्रत्यक्षात राजकीय निरीक्षकांचे लक्ष मात्र आगामी निवडणुकीच्या समीकरणांकडे लागले होते. त्यामुळे जिल्हा बँकेची ही सभा संपली असली, तरी तिच्या निमित्ताने उमटलेले राजकीय संकेत आगामी काळात किती परिणामकारक ठरतात, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Next Post

शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील वृक्षमित्र पै. उमेश रणदिवे यांचा बारामतीत गौरव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group