विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती नगरपरिषदेमधील स्वीकृत सदस्यपदासाठी लवकरच नियुक्त्या होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. सोमनाथ गजाकस, अमोल कावळे, राहुल वाघोलीकर आणि गणेश जोजारे यांची नावे संभाव्य स्वीकृत सदस्य म्हणून पुढे येत आहेत.
नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड ही सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय अनुभवाच्या आधारे केली जाते. संबंधित चारही व्यक्तींनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्यामुळे त्यांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सोमनाथ गाजाकस हे सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून स्थानिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका आहे. अमोल कावळे युवकांमध्ये लोकप्रिय असून संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव आहे. राहुल वाघोलीकर यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले आहे, तर गणेश जोजारे हे प्रशासकीय समन्वय व सामाजिक कार्यासाठी परिचित आहेत.
या संभाव्य नियुक्त्यांमुळे नगर परिषदेमध्ये विविध क्षेत्रांतील अनुभवी प्रतिनिधित्व वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत या नियुक्त्यांबाबत कोणतीही निश्चित माहिती देणे शक्य नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.











