हैदराबाद : महान्यूज लाईव्ह
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्याचा अखेर खात्रीशीर उपाय शोधला आहे, तोही कृषी शास्त्रातला नाही, थेट बॉलिवूडमध्येला. शेताजवळ सनी लिओनीचे मोठे पोस्टर लावले की, वाईट नजर थेट पोस्टरवर अडकते आणि पिकं सुखरूप राहतात, असं शेतकऱ्यांचं ठाम मत बनलय.
बांदा किंडी पल्ली गावातील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने तर कोबी-फ्लॉवरसोबत हे आधुनिक सुरक्षातंत्र तैनात केलं आहे. पिके चांगली आली, पण लोकांची नजर त्याहूनही चांगली नसल्याने तो चिंतेत होता. मग काय, ना बाभळीची काटेरी फेंसिंग, ना पुतळे…चक्क थेट सनी लिओनीचं पोस्टर!
शेतकरी म्हणतात, पिकावर वाईट नजर जायला नको, ती पोस्टरवर गेली पाहिजे. त्या सनी लिओनची तेवढीच आम्हाला मदत झालीय. एकंदरीत, या नव्या पद्धतीनं एवढं तरी सिद्ध केलं आहे की, काही ठिकाणी ‘कृषी संरक्षणापेक्षा पीक सुरक्षित राहील यासाठी दृश्याकर्षण जास्त परिणामकारक ठरतं.











