कोरोना निर्मूलनासाठी राबणाऱ्य हातांची ‘शरयु फौंडेशन’कडून दखल
बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयासह आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शरयु फौंडेशनच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आरोग्य क्षेत्रात कार्यरत घटकांचा सन्मान करण्यात आला. त्याचवेळी बारामती एमआयडीसीत कार्यरत असलेल्या महिलांना एक हजार मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले.
शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरयु फौंडेशनच्या वतीने बारामती एमआयडीसी येथे काम करीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोफत एक हजार मास्क व सनीटायझरचे वाटप आणि मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर व नर्स यांना मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. महिला कर्मचारी व डॉक्टर, नर्स यांनी शर्मिला पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी सर्व डॉक्टर वर्गाला विठ्ठल मूर्ती व टिफीन बॉक्स व कोविडं योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. आमच्या या कामासाठी कोणीच सन्मान व शाबासकी दिली नव्हती ती शरयु फौंडेशन मित्र परिवाराने आम्हाला दिली असे सांगून डॉ. संजय तांबे यांनी शरयु फौंडेशनचे आभार मानले.
यावेळी अनिल मोहिते, रोहित काटे, विक्रम निबांळकर , शूभम निंबाळकर, हसन तांबोळी, आबा टकले, अभय काटे, गौरव जाधव, अमोल पवार, जयदीप बुरूंगले, दत्ता माने, सोमनाथ गायकवाड, स्वप्निल जगताप, पार्थ निंबाळकर, चंदू लोंढे, अक्षय परकाळे, अभिजित घाडगे, अविनाश बांदल, अजिंक्य जगताप, राजेंद्र बापू निंबाळकर, सुभाष शिंदे, डी. एन. जगताप, अनिल काटे, महादेव कचरे, सुधीर पानसरे, आबा टकले, विलास घुले या मित्र परिवाराने उपस्थित राहून मास्क व सॅनिटायझर किटचे वाटप करत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.











