विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : जोपर्यत मी जिवंत आहे तो पर्यंत माळेगांव कारखाना सहकारीच राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मळद, निरावागज, गुणवडी डोर्लेवाडी या भागात आज जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी विरोधकावर टीका करताना विरोधक करत असलेल्या आरोपांवरून त्यांनी वरील वक्तव्य केले.
अजित पवार म्हणाले, त्यांनी काय मुद्दा काढला? जिल्हा बँकेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला. त्या ठिकाणी रणजीत तावरे यांना घेतलं. पण एक लक्षात घ्या मी आता संचालक होण्यासाठी नाही तर मी माळेगांव कारखान्यात चेअरमन होण्यासाठी जात आहे.आता बोर्ड मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे मला कारखाना चालवायचा माहिती आहे. त्याची विरोधकांनी काळजी करण्याची गरज नाही कारखाना असा चालवून दाखवेल की राज्यात त्याचा नावलौकिक असेल.
बारामती सारखा माळेगावचा आणि शिवनगरचा विकास करणार. या विकासासाठी माळेगाव कारखान्याचा एकही रुपया खर्च करणार नाही! जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे, तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारी होता आणि सहकारीच राहणार. तुम्ही निळकंठेश्वर पॅनल सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या. मी माळेगाव आणि शिवनगरच्या परिसराचा कायापालट करून दाखवीन अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ते म्हणाले, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनल संपूर्ण निवडून दिले, तर मी या परिसराचा कायापालट करून दाखवेल. जिल्हा नियोजन मंडळ, राज्य सरकार, केंद्र सरकार, सीएसआर या माध्यमातून विकास करून दाखवू. मी तिथे केवळ संचालक नसेल, तर स्वतः अध्यक्ष असेल. मला कारखाना चालवायची माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कोणी काळजी करू नका. विरोधकांनीही काळजी करायची गरज नाही.
आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आताही विश्वास ठेवा. विरोधक काहीही दिशाभूल करतात. माझ्याकडे 14 कारखाने आहेत, अशी दिशाभूल विरोधक करत आहेत. जर माझ्याकडे एक तेवढे कारखाने आहेत तर दहा कारखाने तुमच्याकडे देतो. चार कारखानेच फक्त माझ्याकडे ठेवतो. ते काहीही बोलतात. आज ते म्हणतात, कारखाना बंद पडणार आणि खाजगी करणार! पण लक्षात घ्या, जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे, तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारी होता आणि सहकारीच राहणार.
अजित पवारांनी विरोधकांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आमचे विरोधक म्हणतात, कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार माझ्याकडे माणसे पाठवत होते. पण मला बोलायचे असते तर मी थेट बोललो असतो. त्यांचे 85 वर्ष वय आहे. या वयात अनेक लोकांना विस्मरण होते. या वयातील लोकांकडे कारखाना सोपवणे चुकीचे ठरणार आहे. मी तुमचा म्हणजे विरोधकांचा अपमान करत नाही, मात्र सर्वात दैदीप्यमान कामे केलेली असल्याचे नीलकंठेश्वर पॅनलच या पाच वर्षात करून दाखवीन.
विरोधक 60000 पोती भिजलेली म्हणतात, त्यांना लगेच घेऊन जा आणि दाखवा. विरोधक फेक नेरेटिव्ह करण्याचे काम करतात. कारखाना अजिबात कर्जबाजारी नाही. कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. काहीही घाबरण्याचे कारण नाही. जर मी ११ वेळा १३ कोटी लोकांचा अर्थसंकल्प मांडू शकतो, तर कारखान्यावर अवलंबून असलेल्या सव्वा लाख लोकांच्या घरात आणू शकत नाही?
त्यांना विस्मरण होतंय..
अजित पवार म्हणाले, माळेगावमध्ये 111 कोटी रुपये बेअरिंग वर खर्च केले असे विरोधक सभेत म्हणाले. पण त्याच सभेत त्यांच्याच माणसाने दुरुस्ती करत एक कोटी म्हणा असे सांगितले. पण त्यावर त्यावेळी त्या माणसाला गप्प बस म्हणत 111 कोटी हाच आकडा सांगितला. चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता, त्यांना विस्मरण होत आहे समजून घ्या! आताच अशी परिस्थिती आहे, अरे काय होईल समजून घ्या. असा अजित पवार यांना टोला मारला.
आज जो अँडव्हान्स दिला आहे ३३३२ रुपये कुठल्याही कारखान्याने दिला नसल्याचे अजित पवार म्हणाले.पुढे बोलताना पवार म्हणाले,आरोप काय करतात कर्ज केलं.ऐपत असेल तर कर्ज देतात.हे काहीही सांगतात.
मी जबाबदारी घेतली आहे.माझी प्रशासनावर पक्कड आहे.बारामतीत सुधारणा झाली आहे.जशी बारामती बदलावली तसा माळेगांवचा परिसर बदलवू.तुम्ही प्रदूषण कमी केलं नाही सांगता तुम्ही देखील ५० वर्ष डायरेक्ट आहात तुम्ही का नाही केलं प्रदूषण कमी अशी टीका विरोधकांवर केली. पुढे बोलताना पवार म्हणाले,खुशाल म्हणतात साखर भिजली एमडी ला विचारल भिजली का नाही ते म्हणाले.नाही भिजली.उपमुख्यमंत्री कसे मासिक सभेला येणार अस सांगतात का उपमुख्यमंत्री विमानाने येऊ शकत नाही.त्याची ऐपत नाही?











