विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी निळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून उद्या ४ सभा घेणार आहेत. माळेगावच्या प्रचारासाठी ते तब्बल १२ सभा घेणार असल्याची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली.
सोमवारी (ता.१६) पहिली सभा मळद येथे असून दुपारी तीन वाजता ही सभा सिद्धराज मंगल कार्यालय येथे होणार आहे. दुसरी सभा डोर्लेवाडी येथे साडेचार वाजता असून ही सभा अनुसया मंगल कार्यालय येथे होणार आहे. तिसरी सभा मेखळी येथे सायंकाळी सहा वाजता असून राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे होणार आहे. चौथी सभा निरावागज येथे सायंकाळी साडेसात वाजता असून ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनेल निवडणूक लढवत आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे त्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. याव्यतिरिक्त माळेगावच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बळीराजा सहकार बचाव पॅनल देखील असून कष्टकरी शेतकऱ्यांचेही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान माळेगावच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 12 सभा घेणार आहेत. एका दिवसाला चार सभा अशा तीन दिवसात १२ सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा माळेगाव येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.











