• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने १५ जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजा मुंडे बारामतीत एकत्र येणार..

tdadmin by tdadmin
January 10, 2025
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने १५ जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजा मुंडे बारामतीत एकत्र येणार..

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: h; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Hdr; cct_value: 0; AI_Scene: (22, -1); aec_lux: 79.90326; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

बारामती : महान्यूज लाईव्ह

येत्या १६ ते २० जानेवारी दरम्यान अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित होणारे कृषिक प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मात्र १५ जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या निवडणूकीनंतर भाजप, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते एकत्र येत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाची शेती पातळीवरही व राजकीय पातळीवरही उत्सुकता आहे.

यासंदर्भात ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षीचे १० वे कृषिक प्रदर्शन दिनांक १६ ते २० जानेवारी, २०२५ दरम्यान होत आहे. हे प्रदर्शन सशुल्क असून यावर्षीचे प्रदर्शन हे कृत्रिम बुध्दीमत्तेच्या संकल्पनेवर आधारलेले आहे.  

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती मार्फत गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षीचे १० वे कृषिक प्रदर्शन दिनांक १६ ते २० जानेवारी, २०२५ दरम्यान होत आहे. थेट प्रात्यक्षिकावर आधारीत कृषी प्रदर्शनाचे हे १० वे वर्ष असून दरवर्षी देशभरातून साधारण अडीच ते तीन लाख शेतकरी भेट देतात. तब्बल १७० एकर प्रक्षेत्रावर या प्रदर्शनाचे आय़ोजन केले जाते. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार हे १९८० च्या दशकात अमेरीकेतील मिशिगन स्टेट मध्ये कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा कॉन्टी मध्ये त्यांनी अशा प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पाहिले होते. नवीन बियाणे, तंत्रज्ञान, खते केवळ पिशव्यांमधून दाखविण्याऐवजी त्यांचा प्रत्यक्ष शेतीतील वापर, त्यांचा त्या पिकावरील प्रभाव व प्रत्यक्ष उत्पादन पाहता येत असल्याने ते अधिक प्रभावी ठरते, याच संकल्पनेतून दरवर्षी  हे प्रदर्शन भरविले जाते.

दरम्यान १६ ते २० जानेवारी दरम्यान होत असलेल्या या प्रदर्शनात राज्यभरातील व परराज्यातीलही शेतकरी सहभागी होणार असून जगभरातील नवे बियाणे, नवे खत व्यवस्थापन, नवे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात रुजताना व त्याचे उत्पादनात रुपांतर होताना शेतकऱ्यांना पाहता येणार आहे, नव्या जातींची लागवड येथील मातीत कशी होते याची प्रत्यक्ष माहिती याद्वारे मिळणार आहे. परदेशी व वाजवी नफा देणारी फळझाडे आपल्या मातीत उत्पादित होतात का? त्याचा खर्च, त्याची बाजारपेठ, त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंकांना उत्तरे मिळणारी नाविण्यपूर्ण फळझाडांची आपल्या भौगोलिक परिस्थितीतील यशस्वी वाढ या ठिकाणी शेतकरी बांधवांना पाहता येईल. अवाकॅडो, फ्लम, पिअर, लिची, रामभूतान, मॅंगोस्टीन, लक्ष्मणफळ, पॅशनफ्रूट, खजूर अशा अनेक फळझाडांचा यामध्ये समावेश आहे.

या वर्षी नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राइल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरीया, जपान, इंग्लैंड (UK), मेक्सीको, स्विडेन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया इत्यादि देशांतील विविध AI, सेन्सर व रोबोटिक  तंत्रज्ञान बियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टुल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे. या देशातील तंत्रज्ञानामध्ये जपान येथील बायोफ्लॉक यंत्रणा, नेदरलैंड, स्पेन, जर्मनी, थायलंड ई. देशातील विषमुक्त शेती उत्पादनासाठी आधुनिक औषधे, सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित नेदरलँड, इंग्लंड, अमेरिका देशातील प्रगत मशिनरी, इस्त्राइल येथील सूक्ष्म सिंचन प्रणाली, इटली येथील सेन्सर चलित मशिनरी तंत्रज्ञान असणार आहे.

Next Post
माळेगाव कारखान्याचीही पहिली उचल २८०० रुपये प्रतिटन!

माळेगाव कारखान्याचीही पहिली उचल २८०० रुपये प्रतिटन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group