राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा उपोषणानंतर मराठा समाज गाठीभेटीचा दौरा आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे. हा महाराष्ट्रातला तिसरा टप्पा असेल. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता याची सुरुवात होणार असून जरांगे पाटील यांनी यापूर्वीच आपण दिवाळी साजरी करणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ऐन दिवाळीत त्यांचा हा दौरा सुरू राहणार आहे.
15 नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी ते सोडतील आणि तेथून 117 किलोमीटर वरील धाराशिव जिल्ह्यातील वाशी ठिकाणी ते सभा घेतील. दुपारी साडेचार वाजता परांडा, रात्री साडेसात वाजता करमाळा असा त्यांचा दौरा असेल.
16 नोव्हेंबर रोजी दौंड येथे सकाळी 11 वाजता दौंड येथील सभा होईल. त्यानंतर मायणी येथे त्यांची सभा होणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी सांगली येथे सकाळी दहा वाजता सभा होणार असून, दुपारी दोन वाजता कोल्हापूर, संध्याकाळी पाच वाजता इस्लामपूर, रात्री आठ वाजता कराड येथे सभा होणार आहे.
18 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सातारा, दुपारी एक वाजता मेढा, चार वाजता वाई, रात्री दहा वाजता रायगड येथे त्यांची सभा होईल. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी रायगड दर्शन ते पाचाड ते रायगड असे दर्शन करणार असून, रायगड दर्शन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता महाडच्या चवदार तळ्यावर जाणार आहेत.