महान्यूज करीअर अपडेट
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भरती होणार आहे. २७ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करावा लागणार आहे.
दहावी, बारावी किंवा पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून याकरीता खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल ३० वर्षे अशी अट आहे. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत आहे.
याची भरती प्रक्रिया संगणकीय चाचणी, शारीरीक क्षमता व मोजमाप चाचणी, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी या चार टप्प्यांनी होणार आहे. या भरती परीक्षेसाठी खुल्या व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये परीक्षा शुल्क असून महिला, अपंग, माजी सैनिक, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी शुल्क माफ आहे.
यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. आरक्षण, शर्ती, अटींसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या https://ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.