बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये बीबीए ( सी.ए), बीएससी (कॉम्प्युटर सायन्स) व बीसीए विभागातील १३ विद्यार्थ्यांची थॉटपॅड इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीमध्ये निवड झाली.
थॉटपॅड इन्फोटेक ही आयटी क्षेत्रात काम करणारी एक नामांकित कंपनी आहे. कंपनीचे सध्या आर्टीफिशील इंटेलिजन्स, आयओटी, सोशल मार्केटिंग अशा विविध विषयांवर काम चालू आहे. ७ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या निवड प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये कंपनीने २०० विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली.
ज्यामधून ९० विद्यार्थ्यांची मुलाखत फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या फेरीमधून ५० विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामधील महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची निवड केली. महाविद्यालयामध्ये थाॅटपॅड इन्फोटेक कंपनीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निवड पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कंपनीतर्फे शिरीष कादबाने, शुभम वाघ, अतुल शिंदे, प्रदीप नाळे, उपस्थित होते तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, प्रा. गजानन जोशी, महेश पवार, सर्व विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कंपनीतर्फे शुभम वाघ यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीदरम्यान आणि निवड चाचणीमध्ये झालेल्या चुका आणि भविष्यात त्यांनी घ्यावयाच्या काळजी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे गजानन जोशी यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या कॅम्पस ड्राईव्ह तसेच पुढे भविष्यात होणाऱ्या कॅम्पस ड्राईव्ह बद्दल माहिती दिली.
या निवडीबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमा शेख यांनी केले.